Crime News : पिस्तुलातून फायर केल्याने तरुण गंभीर जखमी

आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद, खोटी माहिती देत बनवाबनवीचा प्रयत्न
Waluj Crime News
Crime News : पिस्तुलातून फायर केल्याने तरुण गंभीर जखमीfile photo
Published on
Updated on

The young man was seriously injured after being shot with a pistol

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : पिस्तूल हाताळल्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असतानाही पिस्तूल चालवून एका तरुणास गंभीर जखमी केले. उपचारकामी संबंधित डॉक्टरांना खोटी माहिती देणाऱ्या महाठकास वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Waluj Crime News
Sambhajinagar ZP Result 2026: छत्रपती संभाजीनगमध्ये भाजपची सरशी, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

पोलिसांनी याप्रकरणी अझहर शफी सय्यद (रा. अन्सार कॉलनी, सरोज स्कूल शेजारी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील जिवंत काडतुसासह एका पिस्तूलसह ३३ हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची घटना ६ फेब्रुवारीला लिबेंजळगाव टोलनाक्यालगत घडली होती. चौकशीअंती पोलिसांनी आरोपीवर ८ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

याविषयी पोलिसांनी सांगितले की, अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या लिबेंजळगाव लगतच्या टोलनाका परिसरात अझहरने स्वतः जवळील बेकायदा असलेले पिस्तूल समोर चालवून फायर केले. पिस्तुलमधील गोळी जवळच असलेल्या महेश दत्तात्रय पवारच्या (२३, रा. बजाजनगर) उजव्या मांडीत घुसल्याने तो घटनास्थळीच रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला.

Waluj Crime News
जमीन करमाडची, मालक हैदराबादचे अन् तिरुपतीची तोतया महिला

जखमी अवस्थेत असलेल्या महेशला अझहरने शहरातील घाटी दवाखान्यात उपचारकामी दाखल केले. त्यावेळी अझहरने संबंधित रुग्णालयात खोटी माहिती दिली. पोलिसांनाही कळविले नाही. घाटी दवाखान्यातून आलेल्या माहितीआधारे वाळूज पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला. जखमी स्थितीत असलेल्या महेश पवारकडून पोलिसांनी संपूर्ण माहिती घेतली.

त्यावरून पोलिसांचा संशय बळावल्याने पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरलगतच्या पडेगाव येथील अझहरचे घर गाठले. त्या ठिकाणाहून पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणले. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच अझहरने आपले तोंड उघडले. पिस्तूल इम्रानने आणल्याचे त्याने सांगितले. त्याने ते पिस्तूल ४ राऊंडसह जवळच्या एका हॉटेल परिसरात अझहरने हाताळण्याचा प्रयत्न केला, त्यात सदरची गोळी महेशला लागल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

जखमी महेशवर घाटी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अझहर शफी सय्यद (याला अटक केली आहे. याप्रकरणी पोउपनि. वंदना बाबासाहेब मुळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अजय शितोळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news