Navratri festival : शहराचे आराध्य दैवत कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज

शहराचे आराध्य दैवत आणि तब्बल ३५० वर्षांची समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेले कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आगामी नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे.
Navratri festival
Navratri festival : शहराचे आराध्य दैवत कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्जfile photo
Published on: 
Updated on: 

Tuljabhavani temple at Karnapura, the city's idol, is ready for Navratri festival

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराचे आराध्य दैवत आणि तब्बल ३५० वर्षांची समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेले कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आगामी नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. बिकानेरचे राजे करणसिंग यांच्या हस्ते १८८६ मध्ये या देवीची स्थापना झाल्याचा इतिहास असून, नवरात्रोत्सवात कर्णपुरा देवीचे दर्शन आणि पारंपरिक यात्रेचा आनंद घेतल्याशिवाय शहरवासीयांचा उत्सव पूर्ण होत नाही. यंदाही भाविकांच्या सोयीसाठी आणि दर्शनासाठी मंदिर प्रशासन व स्थानिक यंत्रणेकडून व्यापक नियोजन केले जात आहे.

Navratri festival
Harsul Lake : हर्सूल तलाव पुन्हा कोरडा पडण्याच्या मार्गावर

उत्सवाची विधिवत सुरुवात घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ७ वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे संस्थापक अध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते होईल. यंदाचे मुख्य पुजारीपद अंबादास भानुदास दानवे यांच्याकडे असून, संपूर्ण मंदिर व्यवस्था, पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील.

नवरात्रातील पाचव्या माळेला परंपरेनुसार श्री दुर्गासप्तशतीचे पाठ आणि महाअष्टमीच्या दिवशी विधिवत होमहवन व पूर्णाहुतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. धार्मिक विधींसोबतच कर्णपुरा मैदानावर भरणारी यात्रा हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. यात्रेसाठी राज्य तसेच परराज्यांतून पाळणे, खेळणी व विविध साहित्य दाखल झाले आहे. आकाशपाळणा, ब्रेकडान्स झुल्यांची उभारणी सुरू असून विविध खाद्यपदार्थ, खेळणी व पूजेच्या साहित्यांचे स्टॉल्स सज्ज होत आहेत.

Navratri festival
Notice to CJP : आंदोलनात सहभागी न होण्याबाबत सीजेपी कार्यकर्त्यांना नोटीस; दीपके यांची नाराजी

पोलिसांची चोख तयारी

नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात शहरासह मराठवाड्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षित दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि चोख पोलिस बंदोबस्ताची जय्यत तयारी मैदानावर अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदीर प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली आहे. संभाव्य भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news