Tree cutting : बाप्पाच्या स्वागतासाठी वृक्षतोड !

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला हरताळ : मनपा प्रशासनाची डोळेझाक
Sambhajinagar Tree Cutting
Tree cutting : बाप्पाच्या स्वागतासाठी वृक्षतोड !pudhari photo
Published on
Updated on

Trees cut down to welcome Bappa!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मोठ्या गणेशमूर्तीच्या मिरवणुकीसाठी शहरातील झाडांच्या फांद्यांवर चक्क कुऱ्हाड चालविली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sambhajinagar Tree Cutting
Sambhajinaga News : मिलकॉर्नर ते खडकेश्वर रस्ता खड्डेमय

मोठ्या वाहनांमधून आणल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती रस्त्याने नेताना अडथळा ठरणाऱ्या फांद्या महापालिकेची परवानगी न घेताच तोडल्या जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, नगरसेवकांचा दबाव असल्याने मनपा अधिकारी - कर्मचारीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर यंदा शहरातही मोठ्या गणेशमूर्ती आणण्याची लगबग सुरू आहे. विविध गणेश मंडळांकडून आतापर्यंत दहा ते बारा मोठ्या मूर्ती शहरात आणण्यात आल्या आहेत. या मूर्ती मंडपापर्यंत नेण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जात आहेत. मात्र, मोठ्या मूर्ती तसेच त्या वाहून नेणाऱ्या वाहनांना रस्त्यावरील झाडांच्या फांद्या अडथळा ठरत असल्याने काही ठिकाणी त्या सर्रास तोडल्या जात आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या नियमानुसार झाडांच्या फांद्या तोडण्यासाठीदेखील पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. यासह सर्वसामान्य नागरिकांकडून या नियमाचे काटेकोर पालन अपेक्षित असते. मात्र, गणेशमूर्तीच्या वाहतुकीचा विषय समोर येताच नियमांना बगल दिली जात असल्याचे चित्र आहे. नगरसेवकांकडून संबंधित यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याने अधिकारी आणि कर्मचारी कारवाई करण्याऐवजी गप्प बसत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

Sambhajinagar Tree Cutting
Sambhajinagar News : शाळा परिसर तंबाखूमुक्त करा; जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

एकीकडे शासनाकडून झाडे लावा, झाडे वाचवाचा संदेश दिला जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे मोठ्या गणेशमूर्तीच्या वाहतुकीसाठी झाडांच्या फांद्या तोडल्या जात असल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश नेमक कुणासाठी , पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news