Sambhajinagar News : शाळा परिसर तंबाखूमुक्त करा; जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करा.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शाळा परिसर तंबाखूमुक्त करा; जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.file photo
Published on
Updated on

Make school premises tobacco-free: District Collector Vinay Gowda G.C.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, शाळा व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करा. तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले.

Sambhajinagar News
Marathwada : मराठवाड्याच्या उद्योजकतेला जागतिक पंख !

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी छाया आवरगावकर यांच्यासह आरोग्य, शिक्षण, पोलीस व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस असलेल्या प्रतिबंधाची प्रभावी अंमलबजावणी करावी. पथके सक्रिय करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित कारवाई करावी. प्रत्येक शाळेने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेसाठी निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करावी. यासाठी शिक्षण विभागासह संबंधित यंत्रणांनी नियमित कार्यवाही करावी.

Sambhajinagar News
Sambhajinaga News : मिलकॉर्नर ते खडकेश्वर रस्ता खड्डेमय

तंबाखूविरोधी जनजागृती अधिक व्यापक करावी. विशेषतः तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवावेत, असेही जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत विविध विभागांकडून कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्याचा अहवाल नियमितपणे जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे सादर करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news