Pay and Park : पे ॲन्ड पार्कला व्यापाऱ्यांचा नो पार्किंगचा इशारा

संत एकनाथ रंगमंदिरासमोर वसुली सुरू करण्याचा प्रयत्न पाडला हाणून
Pay and Park
Pay and Park : पे ॲन्ड पार्कला व्यापाऱ्यांचा नो पार्किंगचा इशाराfile photo
Published on: 
Updated on: 

Traders warn against 'Pay and Park' by declaring a 'No Parking' zone

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पे अॅन्ड पार्कला उस्मानपुरा येथील व्यापाऱ्यांनी नो पार्किंगचा इशारा दिला असून बुधवारी (दि.४) दुकानांसमोरील रस्त्यावर पार्किंग शुल्क आकारण्याच्या प्रयोगाला तीव्र विरोध केला. संत एकनाथ रंगमंदिरासमोर पे अॅन्ड पार्कची अंमलबजावणी करण्यासाठी आलेल्या खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध करून तेथून परत जाण्यास भाग पाडले. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था केल्यास वाहतूक कोंडी वाढेल आणि दुकानांमध्ये ग्राहकांना ये-जा करणेही कठीण होईल, असा आक्षेप व्यापाऱ्यांनी घेतला.

Pay and Park
FDA : दिवाळीच्या तोंडावर एफडीएची कारवाई; ४ मिठाई उत्पादकांचे परवाने निलंबित

शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने गुजरातमधील एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि संत एकनाथ रंगमंदिर परिसरातील रस्त्यांची पे अॅन्ड पार्कसाठी निवड करण्यात आली. या उपक्रमाच्या तयारीचा भाग म्हणून सुमारे चार महिन्यांपूर्वी संबंधित रस्त्यांवर वाहनतळाच्या जागा निश्चित करण्यासाठी पांढरे पट्टे मारण्यात आले.

पार्किंगचे फलकही लावण्यात आले होते. त्यावेळीच स्थानिक व्यापाऱ्यांनी या व्यवस्थेला विरोध दर्शविला होता. तसेच दुकानांसमोरच वाहनतळ उभारून शुल्क आकारू नये, पे, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, बुधवारी सायंकाळी खासगी एजन्सीचे कर्मचारी संत एकनाथ रंगमंदिर परिसरात पोहोचले आणि पार्किंगची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीला लागले. ही हालचाल दिसताच परिसरातील व्यापारी एकत्र आले. त्यांनी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत पार्किंग शुल्क वसुलीला विरोध केला. व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे कर्मचाऱ्यांना तेथून माघार घ्यावी लागली.

Pay and Park
Sambhajinagar news : आयुक्तांच्या नजरेस पडलेला मद्यपानाचा अड्डा उद्ध्वस्त

वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता

संत एकनाथ रंगमंदिरासमोरील रस्ता मुळातच अरुंद आहे. त्यात रस्त्यावर पे अॅन्ड पार्क सुरू केल्यास वाहनांची गर्दी वाढून वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी वाहने उभी करायची कुठे आणि पार्किंग शुल्कामुळे दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण झाल्यास व्यवसाय कसा करायचा, असे प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केले. दुकानांसमोर वाहनतळाची व्यवस्था केल्यास ग्राहकांसाठी जागाच शिल्लक राहणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.