

Traders' strike in the market committee
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी जाधववाडी बाजार समितीमधील अडत व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (दि.५) एक दिवसाचा बंद पाळला. भाजीपाला खरेदी-विक्री करणारे व्यापारीही बंदमध्ये सहभागी झाले. हा बंद शंभर टक्के यशस्वी केल्याने दिवसभरात सुमारे ३० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष प्रफुल मालानी यानी सांगितले.
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शुक्रवारी भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार घटले. या दिवशी शक्यतो मोजक्याच शेतकऱ्यांचा माल बाज ारात येत असतो. तसेच धान्य खरेदीही सकाळपासूनच ठप्प होती. मात्र शेतकऱ्यांकडून आलेले धान्य उतरवून घेण्यात आले.
परंतु आज त्याचा लिलाव होऊ न शकल्याने शनिवारी (दि.६) होणार आहे. बंद मध्ये अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा. राष्ट्रीय बाजार समिती बाबत शासनाने प्रस्तावित केलेल्या अध्यादेशामधील त्रुटी दूर करण्यासंदर्भाने कृती समितीसोबत त्वरीत चर्चा करा. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कायद्यांमधील बदलांबाबत कृती समिती
राज्य शासनाला मिळते राजस्व शासनाने अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू केला असून, त्याचे राजस्व राज्य शासनाला मिळत असल्याने बाजार समितीने सेस कर रद्द करावा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांकडून बंद पाळण्यात आल्याची माहिती अडत व्यापारी संघटनेकडून देण्यात आली आहे.