

Toyota to build state-of-the-art school in Bidkin
छत्रपती संभाजीनगर, पुढारीसेवा : टोयोटा कंपनी त्यांच्या सीए सआर (सामाजिक दायित्व) फंडातून बिडकीन येथे अत्याधुनिक शाळेची उभारणी करणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि.१८) कंपनीचे जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी. एस. यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. महिना अखेरीस यासंबंधी सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.
टीकेएम म्हणजेच टोयोटा किर्लोस्कर मोटार्स हे बिडकीन औद्योगिक वसाहतीमधील ८२७ एकर जागेत ईव्ही वाहन निर्मिती प्रकल्प सुरू करत आहे. सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्प-वृत्ताव्दारे सुमारे आठ हजार जणांना रोजगार दिला जाणार असून, अप्रत्यक्ष एक ते दीड हजार जणांना रोजगार मिळेल.
सद्यस्थित प्रकल्प उभारणी होत असून, उद्योग क्षेत्रात कंपनीच्या ध्येयधोरणानुसार सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सामाजिक हिताचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यात सर्वप्रथम बिडकीन येथे शाळा उभारणीचे काम कंपनीतर्फे केले जाणार आहे.
अत्याधुनिक अशा शाळेची उभारणी यानिधीतून कंपनी करून देणार आहे. त्यासाठी या महिनाअखेर जिल्हा प्रशासनाशी सामंजस्य करारही केला जाणार आहे. त्यावेळी अधिक तपशील देण्यात येईल, असे जनरल मॅनेजर सोनटक्के यांनी सांगितले.