

Many numberless vehicles are running recklessly in the city.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नवीन वाहन पासिंग झाल्याशिवाय ते वाहनधारकांच्या हाती द्यायचे नाही, असा दंडक असतानाही शहरात अनेक विनाक्रमांकाची वाहने बेदरकरापणे धावत आहेत. वाहतूक पोलिस फोटो काढून ऑनलाईन चालन पाठवत आहेत. वाहनांवर क्रमांकच नसल्याने ते सरळ पोलसांना कितीही फोटो काढा आमचे काहीच होणार नाही अशी मुजोरी भाषा करत निघून जात आहेत. हे वाहनधारक वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकार्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
नवीन वाहनांना नंबर प्लेट बसवल्याशिवाय ते वाहनधारकांच्या हाती देऊ नये अन्यथा त्यांच्यावर आरटीओ कार्यलायाच्या वतीने वाहन विक्रेता आणि त्या वाहनधारकांवर कारवाई होते. असा नियम असूनही आजघडीला अनेक विनाक्रमांकाची वाहने शरहात धावत आहेत. वाहनांवर क्रमांकच नसल्याने वाहतूक पोलिसांना कारवाईही करता येत नाही. हीच संधी साधून विना क्रमांक वाहनधारक सर्रास वाहतूक नियम पायदळी तुडवून परत वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचे आव्हाण देत आहेत. या आव्हाणांपुढे वाहतूक पोलिसही लाचार होत असल्याची परस्थिती शहरात सर्वत्र दिसून येत आहेत.
उच्च न्यायालयाच्या सिग्नलवर दोन दिवसांपूर्वी विना क्रमांक दुचाकीवर तीन तरुण जात होते. हे पाहून तेथील वाहतूक पोलिसांनी त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हे पाहून त्या तीन तरुणांनी कितीही फोटो काढा आमचे काहीच होणार नाही असे आव्हाण देत सिग्नल तोडून पळून गेले. वाहतूक पोलिसाला त्या तरुणांकडे हताशपणे पाहत बसण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अशा मुजोर वाहनधारकांवर वेळीच कारवाई करावी अशी मागणी सर्वसामांन्य वाहनधारकांकडून होत आहे.