

छत्रपती संभाजीनगर : जपानची ऑटोमोबाईल क्षेत्रातील सुट्टे भाग उत्पादक टोयोडा गोसेई कंपनी छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आपला नवीन उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सुमारे ५७५.८ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आणि २०३० पर्यंत सुमारे ५७० जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे संभाजीनगरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
टोयोटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, अथरसह अनेक कंपन्यांचे प्रकल्प बिडकीन औद्योगिक वसाहती प्रगतीपथावर आहे. काहींचे उत्पादन सुरू आहे. जेएसडब्ल्यचे उत्पादन लवकरच लाँच केले जाणार आहे. टोयोटा मोटर्सच्या प्रकल्पातूनही २०२९ च्या पहिल्या सहामाहीत तेथे उत्पादन सुरू होणार आहे. येथील ऑटोमोबाईल क्षेत्रातील तसेच टोयोटा या आपल्या प्रमुख ग्राहकाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी टोयोडा गोसेई कडून संभाजीनगरातील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात सुमारे ७८,४०० चौरस मीटर जागेवर हा नवा प्रकल्प उभारणार आहे.
कंपनीच्या उपकंपनीची ही शाखा असेल आणि भारतातील कंपनीचा हा आठवा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पातून २०२९ च्या पहिल्या सहामाहीत प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होण्याचे नियोजन आहे.
१ प्रमुख उत्पादने : येथे प्रामुख्याने वाहनांचे बाह्य व अंतर्गत भाग (बंपर, डॅशबोर्ड किंवा उपकरणांचे फलक), सुरक्षा प्रणाली (एअरबॅग, स्टिअरिंग व्हील) आणि इंधन वाहून नेणाऱ्या नळ्यांसारख्या तांत्रिक भागांचे उत्पादन घेतले जाईल.
२ अत्याधुनिक तंत्रज्ञान : या प्रकल्पात आधुनिक मोल्डिंग यंत्रे, स्वयंचलित रंगकाम कक्ष, स्वयंचलित मालवाहू गाड्या आणि सौरऊर्जा यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. तसेच, कमी खर्चात अचूक काम करण्यासाठी मानवी सहकार्याने काम करणारे यंत्रमानव (रोबोट्स) आणि पारंपरिक जपानी यांत्रिक तंत्रज्ञानाचा (काराकुरी) वापर केला जाईल.
३ रोजगाराला चालना : सध्या भारतात लहान मोटारींसोबतच मोठ्या मोटारींना (एसयूव्ही) मोठी मागणी वाढत आहे. यामुळे संभाजीनगरमधील ३ बिडकीन येथे होणारी ही गुंतवणूक स्थानिक स्थानिक औद्योगिक औद्य विकासाला आणि रोजगार निर्मितीला मोठी कलाटणी देणारी ठरणार आहे.