

Tourist flow to Mhaismal increased
खुलताबाद : दोन दिवसाच्या संततधार पावसाने थंड हवेचे ठिकाण असलेले पर्यटकांना मोहित करण्याऱ्या म्हैसमाळकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. शनिवारी रविवारी दोन दिवस सुट्टी असल्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणींनी म्हैसमाळ व वेरूळ लेण्या बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.
परिसर हिरवागार झाला असून म्हैसमाळच्या डोगरातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे वेरूळ लेणी येथेल प्रसिद्ध सीताची न्हाणीचा धबधबा बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, तालुक्यात शुक्रवार, शनिवार दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. नदी नाल्यांना पावसाच्या पाण्याने अंघोळ घालून तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्याला गिरीजा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा झाल्याने शहरासह वीस गावांचा पाणीप्रश्न मिटला.
शनिवारी दुपारी जोरदार पावसाने खुलताबाद शहरासह, म्हैसमाळ येथील येळगंगा, सुलतानपूर नदी, बाजारसावंगी येथील धाड नदी, धामणगाव नदी, इंदापूर नदीला पूर आला होता. यांसह रसूलपुरा, घोडेगाव, गदाना, काटशेवरी, गोळेगाव, टाकळी राजेराय, गल्लेबोरगाव, पळसावडी, वेरूळ, सराई, भडजी, खिर्डी, तिसगाव, आखातवाडा, चिंचोली, मावसाळा गावांत पावसाने हजेरी लावली.