Ganesh festival |
Ganesh Mandal News : नवीन गणेश मंडळांना मनपाकडून तीन वर्षांची निःशुल्क परवानगी Pudhari Photo

Ganesh Mandal News : नवीन गणेश मंडळांना मनपाकडून तीन वर्षांची निःशुल्क परवानगी

या निर्णयामुळे नवोदित मंडळांना उत्सव सुरळीत पार पाडण्यास मोठा हातभार मिळणार आहे.
Published on

Three-year free permission from Municipal Corporation for new Ganesh Mandals

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील नवीन गणेश मंडळांना दिलासा दिला असून यंदा नव्याने स्थापन होणाऱ्या गणेश मंडळांना सलग तीन वर्षांसाठी निःशुल्क परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे नवोदित मंडळांना उत्सव सुरळीत पार पाडण्यास मोठा हातभार मिळणार आहे.

Ganesh festival |
Sambhajinagar Political News : वेळ कठीण, तरीही जिंकणारच, शिवसेना उबाठा पक्षाच्या शिबिरात नेत्यांचा विश्वास

महापालिकेकडून दरवर्षी गणेशोत्सवासाठी मंडळांना परवानगी देण्यात येते. मात्र अनेकदा मंडळांना शुल्क भरावे लागते, त्यातच इतर नियमांची अडचणही उभी राहते. त्यामुळे यंदा विशेष निर्णय घेत, नवीन मंडळांना तीन वर्षांपर्यंत शुल्कमुक्त परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

दरम्यान, पाच वर्षांची कायमस्वरूपी परवानगी घेत लेल्या जुन्या मंडळांनी परवानगीमध्ये नमूद केलेल्या स्थळ व स्टेज, मंडप क्षेत्र यामध्ये बदल करू नये. तसेच इतर अटी शर्तीचे पालन करावे. त्यांच्या ५ वर्षांच्या परवानगीचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी नव्याने परवानगी घ्यावी, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Ganesh festival |
Sambhajinagar Crime News : संभाजी कॉलनी खूनप्रकरणी नागरिकांत संताप

गणेशोत्सवाच्या पारंपरिक वातावरणाला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन व मंडळांनी परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे असून गणेश मंडळांनी नियमांचे पालन करणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news