गोमांस वाहतुकीची पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून तिघांवर जीवघेणा हल्ला

हत्याराचा धाक दाखवून जमावाकडून चाकू, दगडांनी मारहाण : अंबेलोहळ येथील घटना
Sambhajinagar crime News
गोमांस वाहतुकीची पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून तिघांवर जीवघेणा हल्लाFile Photo
Published on
Updated on

Three people were subjected to a life-threatening attack for informing the police about the transportation of beef

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गोमांस वाहतुकीची पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून तिघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून पिस्टलसदृश हत्याराचा धाक दाखवून जमावाने चाकू, दगडांनी मारहाण करून तीन तरुणांना गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री १० वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथे घडली. मोहीन नन्नु शेख, तोफीक कुरेशी, मुस्ताक व त्यांचे १५ ते २० साथीदार अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविर-ोधात एमायडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar crime News
महापौरपदाची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात

कासोडा येथील गौरव पोपट पातकळ (२१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अंबेलोहळ येथून गौमांसाची वाहतूक करणारी एक स्विफ्ट कार (एमएच-०२-एपी-२९२१) शहराकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गौरव पातकळ यांनी डायल ११२ वर पोलिसांना कळवले त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास अंबेलो हळकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार दिसली.

वाहनाची तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले. याबाबत त्यांनी पुन्हा पोलिसांना माहिती दिली. तसेच मित्र रामहरी बोराडे, रुपेश दुधाट व महेश गाडेकर यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी घटनास्थळी आरोपी मोहीन नन्नु शेख, तोफीक कुरेशी, मुस्ताक व इतर १५ ते २० जणांचा जमाव जमला होता. यावेळी जमावाने अचानक फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

Sambhajinagar crime News
जि.प.निवडणुकीनंतर होणार मनपाच्या २२७ पदांची भरती

आरोपी मोहीन शेख याने पिस्टलसदृश हत्यार व चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तर जमावाने दगड, लोखंडी रॉड व चाकूने हल्ला चढवला. या गोंधळानंतर संबंधित कार घेऊन आरोपी पसार झाले. याचदरम्यान तोफीक कुरेशी व मोहीन शेख याने रामहरी बोराडे यांच्या छातीवर पिस्टलसदृश हत्यार लावून मारहाण केली. यावेळी जीव वाचवण्यासाठी फिर्यादी व त्यांचे सहकारी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर सुमारे पावणे अकरा वाजेच्यासुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

गावात गेल्यावर पुन्हा हल्ला फिर्यादी व त्यांचे सहकारी अंबेलोहळ गावात गेले असता तेथे पुन्हा जमावाने हल्ला चढवला. तुम बहोत मस्ती मे आ गये हमारे गाड्या पकड रहे हो, तुम कितना भी उडलो हमारा कुछ नही कर सकते असे म्हणत महेश गाडेकर व रुपेश दुधाट यांना मारहाण करण्यात आली.

रुपेश दुधाट यांच्या छातीवर वार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मुस्ताक व नन्नु शेख यांनीही हल्ल्यात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. तसेच पुन्हा परिसरात दिसल्यास जिवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक गिते करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news