Crime News : शेतीच्या वादातून तिघांना बेदम मारहाण

एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल
Sambhajinagar crime news
Crime News : शेतीच्या वादातून तिघांना बेदम मारहाणFile Photo
Published on
Updated on

Three people brutally beaten over a land dispute

कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील घुसूर तांडा येथे शेतीतील कामाच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांनी पती, पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दि. १० रोजी सायंकाळी घडली.

Sambhajinagar crime news
Mungsapur Ashram Controversy | मुंगसापूर आश्रमात पपई विक्रीवरून शेतकऱ्याला मारहाण; बापू महाराजांसह 8 जणांवर गुन्हा, जेहूर गाव बंद

या प्रकरणी आदिनाथ शंकर जाधव (वय ३७, रा. घुसूर तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश शंकर जाधव, बन्सीलाल शंकर जाधव, सुनीता अंकुश जाधव व वनिता बन्सीलाल जाधव (सर्व रा. घुसूर तांडा) यांच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आदिनाथ जाधव हे त्यांची पत्नी मंजुळा व मुलगी राधा यांच्यासह शेतात कांद्याचे बी तयार करण्यासाठी कांद्याची बोंडे तोडत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व ही शेती आमची आहे, तुम्ही कांद्याची बोंडे तोडू नका, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद पुढे हाणामारीत परिवर्तीत झाला.

Sambhajinagar crime news
शेतीच्या वादातून महिलेला मारहाण

आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. बी. बोराडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news