

Three men gang-raped a married woman after giving her beer.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर चुकून आरोपींच्या खोलीत गेलेल्या विवाहितेला दारू पीत बसलेल्या तीन नराधमांनी आत ओढून तिला बळजबरीने बिअर पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना बुधवारी (दि.१७) रात्री ११ ते पहाटे ३ वाजेदरम्यान रेल्-वेस्टेशन भागातील एका हॉटेलमधील रूममध्ये घडली. घटनेनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींच्या वेदांतनगर पोलिसांनी तीन तासांत मुसक्या आवळल्या.
घनश्याम भाऊलाल राठोड (२७), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (२५, दो घेही रा. न्यू शांतिनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी) आणि किरण लक्ष्मण राठोड (२५, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी गुरुवारी (दि.१८) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडिता ही विवाहित असून तिला एक बाळ आहे. पती पूर्वी काही काम करत नव्हता, सध्या तोही कामाला जातो. तर पीडिता एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करते. तिला पैशाची गरज असल्याने तिने भोकरदन येथील मित्राला पैसे मागितले होते. ते घेण्यासाठी मित्राने तिला बुधवारी भेटण्यासाठी रेल्वेस्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिच्या मित्राने तिथे १०५ क्रमांकाची रूम बुक केलेली होती. दोघांनी रात्री बराच वेळ बसून मद्यप्राशन करून नंतर जेवण केले. रात्री अकराच्या सुमारास पीडिता फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर आली होती. काही वेळात ती परत हॉटेलमध्ये गेली.
मात्र तिने चुकून १०५ ऐवजी खोली क्र. २०५ चा दरवाजा वाजविला. त्या रूममध्ये तिन जण दारू पार्टी करत बसलेले होते. पीडितेने त्यांना मित्राचे नाव घेऊन तो कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी इथे नाही असे म्हटले. मात्र ती मागे फिरताच एकाने तुझा मित्र इथेच आत आहे असे सांगून तिला रूममध्ये घेतले. दार आतून लावून घेत तिला बळजबरीने बिअर पाजली.
त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत दरवाजा उघडून आरडाओरड केली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलिस ठाणे गाठले. तोपर्यंत तिन्ही आरोपींनी हॉटेलमधून धूम ठोकली होती. पीडितेने वेदांतनगर ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक संगीता गिरी यांनी तिची विचारपूस केली. तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. तोपर्यंत पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी विशेष पथकाला आरोपींच्या शोधात रवाना केले.
मोबाईल बंद करून पसार
सकाळी हॉटेलमधून पळून गेल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवले होते. एसीपी सागर देशमुख यांनी तात्कळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, पीए-सआय संगीता गिरी, रणजित सुलाने, मनोज चव्हाण, प्रवीण मुळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, खोली बुक करणाऱ्या आरोपीच्या नावावरून तिघे निष्पन्न केले. त्यानंतर जिन्सी, मोंढा आणि भानुदासनगर अशा तीन ठिकाणा-हून तिघांना तीन तासांत बेड्या ठोकल्या.
तिघे अविवाहित, फायनान्समध्ये कामाला
आरोपी घनश्याम, ऋषिकेश, किरण तिघेही अविवाहित आहेत. दोन जण ओम फायनान्स येथे वसुलीची काम करतात. तर ऋषिकेश हा खासगी काम करतो तसेच शिक्षणही सुरू आहे. तिघेही मित्र आहेत अशी माहिती समोर आली आहे.