Crime News : ओहरच्या माजी सरपंचाच्या हत्येनंतर तणाव कायम

चौकातील अतिक्रमण काढण्याची मागणी करत नागरिकांचा रास्ता रोको
former sarpanch murder case
ओहरच्या माजी सरपंचाच्या हत्येनंतर तणाव कायमFile Photo
Published on
Updated on

Tension persists after the murder of the former sarpanch of Ohr.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हर्सल भागातील ओहर गावाचे माजी सरपंच दादा पठाण यांची बुधवारी (दि.१७) ११ जणांच्या टोळक्याने जागेच्या वादातून रॉडने मारहाण करून हत्या केली होती. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.१८) गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. आरोपींनी गावातील मुख्य चौकात केलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे, अशी मागणी करत संतप्त नातेवाइकांसह नागरिकांनी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले.

former sarpanch murder case
Municipal election : नेत्यांना हवीत घरातच तिकिटे

दरम्यान, गुरुवारी हर्मूल पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. अफरोज खान गयाज खान पठाण (४२) आणि समीर खान जमीर खान पठाण (३२, दोघेही रा. ओवर) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.

यापूर्वी अटक असलेले इम्रान खान मोईन खान पठाण आणि उमेर खान जमीर खान पठाण यांच्यासह चौघांना तपास अधिकारी एपीआय सचिन सदाफुले यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

former sarpanch murder case
शिवसेनेच्या इच्छुकांनीही दिल्या भाजपच्या मुलाखती

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी सरपंच दादा पठाण यांची हत्या करणाऱ्या आरोपींनी गावातील मुख्य चौकात अतिक्रमण करून दुकान थाटले आहे. तिथे शहरातील काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा अड्डा बनला आहे. आरोपी पठाण कुटुंबाला सतत धमक्या देत होते. भविष्यातही त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हे अतिक्रमण प्रशासनाने तात्काळ हटवावे, अशी आक्रमक मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

त्यासाठी गुरुवारी सकाळी गावकऱ्यांनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला. गावकरी रस्त्यावर आल्याचे कळताच हसूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे, पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी संतप्त ग्रामस्थांची आणि नातेवाईकांची समजूत काढली. अतिक्रमणाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे मागे घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news