FDA : सातारा परिसरातील 'क्लिफ ऑल डे डायनिंग' हॉटेलचा परवाना निलंबित

ग्राहकांच्या आरोग्याचा मांडला होता खेळ
FDA Action
FDA : सातारा परिसरातील 'क्लिफ ऑल डे डायनिंग' हॉटेलचा परवाना निलंबितfile photo
Published on: 
Updated on: 

License of 'Cliff All Day Dining' hotel in Satara area suspended

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातारा परिसरातील मे. क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी एलएलपीचा अन्न परवाना एफडीएकडून तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याचा गंभीर धोका आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

FDA Action
Sambhajinagar News : प्रशासकीय काळातील कामांची होणार चौकशी

राज्यात सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी धडक कारवाई सुरू आहे. याअंतर्गतच अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी सातारा परिसरातील चाटे स्कूल रोड येथील 'क्लिफ ऑल डे डायनिंग' या हॉटेलची ६ ऑक्टोंबर रोजी अचानक तपासणी केली होते.

तेव्हा अन्न सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या. हॉटेल परिसरात प्रचंड अस्वच्छता, उघड्या खिडक्या आणि कीटक प्रादुर्भाव दिसून आले. कच्चे व शिजवलेले तसेच शाकाहारी व मांसाहारी अन्न एकत्रित ठेवल्याचे आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा कोणताही दस्तऐवजी पुरावा किंवा चाचणी कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षक पोशाखांचा वापर करत नसल्याचे आढळले.

FDA Action
Plot Sale Fraud : बॉण्डवर एकाच प्लॉटची तिघांना विक्री, १४ लाखांची फसवणूक

शीतकरण व तापमानाचे निकष न पाळणे, पुरेसे वायुवीजन नसणे, वापरलेल्या खाद्यतेलाची नियमित पडताळणी न करणे आणि कचरा व्यवस्थापनाचा अभाव दिसून आला. या सर्व त्रुटींमुळे तयार अन्न दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला तातडीचा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने अन्न परवाना तात्काळ निलंबित केला.

कडक कारवाईचा इशारा

या आदेशानुसार हॉटेलमधील अन्न उत्पादन, प्रक्रिया, विक्री आणि ग्राहकांना अन्नसेवा देणे तात्काळ बंद करण्यात आली आहे. पुढील लेखी आदेशापर्यंत व्यवसाय सुरु न करण्याची तंबीही दिली आहे. तसेच सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news