Sambhajinagar Crime : व्हिडिओ व्हायरलची धमकी, 'त्या' तरुणीने जीवन संपवले

जीवन संपविण्यास प्रवृत्त करणाऱ्या मित्रावर गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : व्हिडिओ व्हायरलची धमकी, 'त्या' तरुणीने जीवन संपवलेPudhari File Photo
Published on
Updated on

Threat of video going viral, 'that' young woman ends her life

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सुसाईड नोट लिहून निकिता रवींद्र पवार (२४, रा. वांजुळपोई, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) हिने ७सप्टेंबरला आविष्कार कॉलनीत खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मित्र आरोपी श्रेयस दिलीप पुराणे (रा. करंगाव, ता. नेवासा. जि. नगर) हा तिला वारंवार फोन करून तू माझ्याशी पूर्वीसारखे संबंध ठेवले नाही तर आपले व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी देत होता. त्याला वैतागून निकिताने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Sambhajinagar Crime
Marathwada Rain : मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ, जायकवाडीचे दरवाजे उघडले; गोदावरीला पूर

निकिताचा भाऊ फिर्यादी ओम रवींद्र पवार (२२, रा. वांजुळपोई) याच्या तक्रारीनुसार, तो आई व बहीण निकिता सोबत राहतो. शेतीवर उदर्निवाह करतो. निकिताचे बी फार्मसी झाल्याने ती वाळूजच्या वोखार्ड कंपनीत नोकरीला लागली होती. एन ६ आविष्कार कॉलनीत शिंदे यांच्या घरात मैत्रिणींसोबत ती किरायाने १ जुलैपासून राहत होती. करंजगाव नेवासा येथे बारावीत शिकताना तिची आरोपी श्रेयस पुराणेसोबत मैत्री झाली होती. तो निकिताला नेहमी मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणायचा. निकिताने ही बाब अनेकवेळा घरी सांगितली. मात्र घरच्यांची लक्ष दिले नाही.

निकिता शहरात आली त्यानंतरही पुराणे तिला वारंवार फोन करून आपले पहिले रिलेशन तसेच ठेवू लग्नाचे नंतर बघू, असे म्हणत असल्याचे निकिताने भावाला ५ सप्टेंबरला फोनवर सांगितले होते. त्यानंतर पुराणेने ओमलासुद्धा फोन केला. निकिताने त्याचे फोन घेऊ नका, असे सांगितले होते. त्यानंतर पुराणे निकिताच्या आईलाही वारंवार फोन करू लागला.

Sambhajinagar Crime
Sambhajinagar News : शटडाऊनविनाच मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम सुरू

दरम्यान, ६ सप्टेंबरला निकिताने आईला फोन करून पुराणे तिला फोन करून पूर्वीप्रमाणे संबंध ठेवले नाही तर आपले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करील, अशी धमकी देत असल्याने माझी मनस्थिती बिघडली असल्याचे सांगितले होते. तिला घरच्यांनी सुटी काढून ये, असे सांगितले तेव्हा तिने होकार दिला होता.

दरम्यान रविवारी (दि.७) निकिता कंपनीत गेली नाही. सायंकाळी शेजारच्या खोलीमधील मुली मेसवर जाण्यासाठी तिला बोलविण्यासाठी आल्या. मात्र तिने दरवाजा उघडला नाही. मुलींनी खिडकी उघडून बघितल्यानंतर निकिताने गळफास घेतल्याचे दिसून आले होते. प्रियांकाने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात आई, आजी भावाची माफी मागितली. भावाला आईचा सांभाळ कर, असे लिहिले होते. याप्रकरणी आरोपी श्रेयस पुर- ाणेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास राडकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news