Vaijapur News : शिवना नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूचा बेकायदा उपसा

नदीकाठच्या १९ शेतकऱ्यांना प्रशासनाची नोटीस
Vaijapur News
वाळूचा अवैध उपसाfile photo
Published on
Updated on

Thousands of brass of sand illegally extracted from the Shivana riverbed

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील शिवना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या वाळूचा उपसा झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी महसूल विभागाने पंचनामे केले असून, जवळपास ६ हजार ब्रास वाळूची चोरी झाल्याचा अंदाज आहे.

Vaijapur News
पंधरा वर्षांपासून कर न भरणाऱ्यांची यादी करा

उपविभागीय अधिकारी यांनी या वाळू चोरीला ज्या गटातून वाळूची चोरी झाली, त्या शेतकऱ्यांना दोषी ठरवले असून, १९ शेतकऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यातून शिवना व गोदावरी या प्रमुख नद्या वाहतात. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध होते. या वाळूतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, परंतु या वाळू ठेक्याचे काही दिवसांपासून लिलाव झालेले नाहीत.

त्यामुळे महसूल व पोलिस यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. त्यामुळे शासनाचा महसूल मात्र बुडत आहे. या प्रकरणी तक्रारी असल्याने महसूल विभागाने शिवना पात्रातील वाळू चोरीचे पंचनामे केले. शिवना नदीपात्रातून जवळपास सहा हजार ब्रास वाळू चोरी झाल्याचा अंदाज पंचनाम्यात नमूद करण्यात आला आहे. या वाळूला ४००० रुपये ब्रासप्रमाणे बाजारमूल्य आकारण्यात आले आहे.

Vaijapur News
उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली, दोन ठार

चोरी झाल्यानंतर बाजारमूल्याच्या पाच पट दंड आकारण्यात येतो. हा दंड संबंधितांनी न भरल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच या दंडाच्या रकमेचा संबंधिताच्या मालमत्तेवर बोजा टाकण्यात येतो. शिवना नदीपात्रातील वाळू चोरीला महसूल विभागाने ज्या गटातून वाळूची चोरी झाली, त्या शेतकऱ्याला दोषी ठरवले आहे.

त्यामुळे शिवना नदीपात्रालगतच्या १९ शेतकऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. त्यांना या प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच सातबारावर बोजा टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांत लाखणीचे ३, जांबरखेडा २, झो-लेगाव १० बायगाव ४ यांचा समावेश आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकरीवर्गात एकच खळबळ उडाली आहे.

या भागात कारवाई कधी?

तालुक्यातील अव्वलगाव, नागमठाण, भालगाव, बाभूळगाव गंगा येथे केनीच्या साह्याने व नदीकाठी मोठे स्टॉक करण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई कधी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने इथे कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news