New Water Supply Scheme : नव्या पाणी योजनेच्या कामांसाठी पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ नको

मुंबईतील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश : कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
New Water Supply Scheme
New Water Supply Scheme : नव्या पाणी योजनेच्या कामांसाठी पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ नकोfile photo
Published on: 
Updated on: 

There should be no need to dig up roads again for the new water supply scheme works

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असतानाच शहरातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी पोहोचविण्याचे नियोजन करा. भविष्यात घरगुती नळजोडणीसाठी पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी नळजोडणीची कामे तातडीने सुरू करा, असे निर्देश सोमवारी (दि.५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील बैठकीत दिले. यावेळी त्यांनी जलकुंभांची रखडलेली कामेही वेगाने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने आवश्यक मनुष्यबळ वाढवावे, असे आदेश दिले. यासह कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी बैठकीत दिला.

New Water Supply Scheme
Crime News : छावणीत राडा : गोवंश भरलेला ट्रक पकडणाऱ्या पोलिसांवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत आढावा घेतला. यावेळी त्यांनी योजनेची पाइपलाइन टाकताना घरगुती नळजोडणीची कामेही त्याचवेळी पूर्ण करण्याची सूचना केली. तसेच जायकवाडी धरणातील जॅकवेलवर उभारण्यात येणाऱ्या शेडचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका यंत्रणांनी केवळ कंत्राटदारांकडून काम करून घेण्यापुरती भूमिका न ठेवता, प्रकल्पाचे निर्धारित उद्दिष्ट प्रत्यक्षात पूर्ण होत आहे की नाही, यावर प्रभावी देखरेख ठेवावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. शहरातील अनेक भागांत नवीन सिमेंटचे रस्ते खोदल्यानंतरही ते पूर्ववत करण्याची कामे कंत्राटदारांकडून करण्यात आलेली नाहीत.

New Water Supply Scheme
Sambhajinagar News : कुंभार समाजबांधवांसाठी ७०० ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ

त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन पाइपलाइनचे काम पूर्ण होताच खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेषतः नवीन सिमेंटचे रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती रखडू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पाची निर्धारित मुदत संपूनही कामे अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

रस्ते खोदण्यापूर्वीच नळजोडणीचे नियोजन

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी शहरातील विविध भागांत रस्ते खोदण्यात आले आहेत. पाइपलाइन टाकल्यानंतर पुन्हा घरगुती नळजोडणीसाठी रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी नळजोडणीचे नियोजन योजनेच्या कामासोबतच करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे पाइपलाइनचे काम, नळजोडणी आणि रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news