12th board exam : बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात ७ संवेदनशील केंद्र

उद्यापासून परीक्षा, जिल्ह्यात ६५ हजार परीक्षार्थी
12th board exam
बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात ७ संवेदनशील केंद्रpudhari photo
Published on
Updated on

There are 7 sensitive centers in the district for the 12th-grade examination

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवार (दि.१०) पासून सुरुवात होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५९ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, जिल्ह्यातील तब्बल ६५५१५ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यावेळी जिल्ह्यात संवेदनशील परीक्षा केंद्रांची संख्या ७ इतकी आहे.

12th board exam
Sambhajinagar ZP Result 2026: छत्रपती संभाजीनगमध्ये भाजपची सरशी, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

बारावी परीक्षांची तयारी राज्य मंडळाकडून पूर्ण झाली आहे. यंदा परीक्षा सुरळीत, पारदर्शक व गैरप्रकारमुक्त पार पाडाव्यात यासाठी विभागीय मंडळाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील सुविधा, मनुष्यबळ व तांत्रिक तयारींवर विशेष भर देण्यात आला आहे. बारावीची परीक्षा येत्या १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

परीक्षेच्या कामकाजासाठी परीरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील आसन व्यवस्था, प्रनपत्रिका वितरण आणि गोपनियमता परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा सीसीटीव्ही यंत्रणेला विशेष महत्व देण्यात आले आहे. सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध न करून देणाऱ्या परीक्षा केंद्रांवर पुढील वर्षी परीक्षा न घेण्याचा इशारा विभागीय मंडळाकडून याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत.

12th board exam
मद्यधुंद जेसीबी चालकाने चिमुकल्याला चिरडले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६५५१५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केलेली आहे. मागील काळातील गैरप्रकार आणि तक्रारींच्या अनुषंगाने संवेदनशील केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७ संवेदनशील केंद्र असणार आहेत. या केंद्रांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.

संवेदनशील केंद्रे

राजर्षी शाहू महाराज उच्च माध्यमिक विद्यालय, जटवाडा रोड

शांताराई कनिष्ठ महाविद्यालय, ताजनापूर, ता. खुलताबाद

ज्ञानकुंज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बाजारसावंगी, ता. खुलताबाद

न्यू हायस्कूल, दावरवाडी, ता. पैठण

राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय, घनवट फर्दापूर, ता. सोयगाव

शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, सावळदबारा, ता. सोयगाव

बाबासाहेब भाऊ आकात कनिष्ठ महाविद्यालय, टाकळी कोलते, ता. फुलंब्री ७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news