Sambhajinagar News : उसाच्या काट्यात चोरी; कारखान्यांची होणार तपासणी

विभागीय आयुक्तांचे निर्देश, कोल्हापूरप्रमाणे ऊसदराच्या अंमलबजावणीची मागणी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : उसाच्या काट्यात चोरी; कारखान्यांची होणार तपासणीfile photo
Published on: 
Updated on: 

Theft at sugarcane weighing scales; sugar mills to undergo inspection

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर, सोलापूरप्रमाणेच मराठवाड्यातही उसाला ३९०० रुपये दर का दिला जात नाही. याबाबत तातडीने अहवाल सादर करा, त्यासोबतच साखर कारखान्यांकडून उसाच्या काट्यात होत असलेल्या चोरीची भरारी पथकामार्फत तपासणी करा, असे आदेश गुरुवारी (दि. २६) सीएसएमआरडीएच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले.

Sambhajinagar News
चांगले काम करा, चुकीला माफी नसेल

यावेळी प्रदेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ, विभागीय सह आयुक्त रिता मेत्रेवार, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, रविराज साबळे, यांच्यासह मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील ऊसउत्पादक शेतकरी, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर, सोलापूरमध्ये शेतकऱ्यांच्या उसाला साखर कारखान्यांनी ३९०० रुपयांची पहिली उचल दिली आहे. त्यानंतर १०० आणि शेवटी २०० रुपये असे एकूण ४२०० रुपयांचा भाव दिला आहे. हाच दर राज्यभरात सर्व साखर कारखान्यांनी द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात केवळ मराठवाड्यातच या आदेशाची अंमलजबजावणी कारखान्यांकडून केली जात नसल्याची तक्रार शेतकरी संघटनांनी केली. तसेच विभागातील बहुतांश कारखान्यांनी अद्याप दरही निश्चित केला नसल्याचेही सांगण्यात आले.

याबाबत विभागात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने झाली. दरम्यान, या आंदोलनांची दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे सादर करण्यासाठी गुरुवारी (दि. २६) छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या (सीएसएमआरडीए) कार्यालयात बैठक घेतली. त्यावर स्थानिक पातळीवर शक्य असलेले निर्णय घेत त्यांनी साखर विभागाचे प्रादेशिक सहसंचालकांना कारखान्यांचे वजन काटे तपासण्याचे आदेश दिले. त्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सतत धाडी टाकण्याची सूचना केली. कोल्हापूर, सोलापूरप्रमाणे दर का दिले जात नाही. याबाबत साखर आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : हर्सूलच्या आगीतील दोषींवर कारवाई का नाही ? नगरसेवकांचा प्रशासनाला जाब

रिकव्हरीची चौकशी करा

कोल्हापूर, सोलापूरला जास्त दर मराठवाड्यात कमी, असा सवाल उपस्थित करीत बीड, धाराशिवच्या शेतकऱ्यांने साखर कारखान्यांकडून करण्यात येणाऱ्या रिकव्हरीतील घोळावर बोट ठेवला. रिकव्हरी जास्त दाखविली की, उसाला जास्त दर द्यावा लागतो. कमी दर दाखवला की कमी दर देणे शक्य होते, असा फंडा कारखानदार करीत असून त्याची अगोदर चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

बैठकीनंतर शेतकऱ्याच्या घोषणा

आयुक्त जी. श्रीकांत यांनी बैठक घेत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. परतु, काही शेतकऱ्यांनी आम्हाला बोलू दिले नसल्याचा आरोप करीत बैठकीतून बाहेर पडताना घोषणा देत बैठकीवर निषेध व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.