चांगले काम करा, चुकीला माफी नसेल

जिल्हाधिकारी गौडा यांचा तलाठ्यांना इशारा, एका छताखाली येत केली झिरो पेंडन्सी
sambhajinagar news
चांगले काम करा, चुकीला माफी नसेलfile photo
Published on: 
Updated on: 

Talathis achieved 'zero pendency' by working together under one roof

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चांगले काम केले आणि त्या कामाचा जर कोणी विरोध करीत असेल. तर त्यासाठी संबंधित तलाठ्यांच्या पाठिशी उभा राहिल. परंतु, थोड्या आमिषापोटी जर एकानेही चुकीचे काम केले. तर त्या चुकीला माफी नसेल, त्यांनी परत माझ्याकडे येऊ नये, अशा शब्दात गुरुवारी (दि. २६) वंदे मातरम् सभागृहातील एक दिवसीय कार्यशाळेत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी इशारा दिला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जिल्ह्यात ५१६ तलाठी, ८८ मंडळाधिकाऱ्यांनी छताखाली हजर होऊन सर्व प्रलंबित कामांचा निपटारा करीत झिरो पेंडन्सी केली.

sambhajinagar news
Robbery Case : उल्कानगरीत भरदिवसा घरफोडी

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ बंगाळे, तहसीलदार शिवानंद बिडवे, अप्पर तहसीलदार उमेश पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. संविधानातील मूल्ये व तत्त्वांचे स्मरण करून देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी गौडा यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पीक पाहणीच्या कामात नेटवर्क उपलब्ध नसल्याची अडचण अनेकदा मांडली जाते. मात्र, पीक पाहणीसाठी ऑफलाइन सुविधेचाही वापर करता येतो.

sambhajinagar news
Sambhajinagar News : स्थायी समिती सभापतींचे मुख्य लेखाधिकाऱ्यांचा पदभार काढण्याचे निर्देश

नेटवर्क नसलेल्या भागातही जीपीएसच्या मदतीने पीक पाहणी करता येते. त्यामुळे कारणे सांगण्यापेक्षा उपलब्ध तांत्रिक सुविधांचा वापर करून कामे वेळेत पूर्ण करा, असे ते म्हणाले. शासकीय सेवेत काम करताना नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेणे आवश्यक आहे. समाजाच्या गरजा आणि नागरिकांच्या मागण्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट वर्क करा, अधिकाऱ्यांनी एआयचा वापर करणे शिकावे, असे आदेश त्यांनी दिले. त्यासोबतच चुकीच्या कामाला माफी नसेल असा इशाराह त्यांनी दिला.

कोतवाल, पोलिस पाटील भरती

मनुष्यबळाच्या कमतरतेवर ते म्हणाले की, गावपातळीवरील कामकाजासाठी कोतवाल आणि पोलिस पाटील यांची भरती प्रक्रिया सुरू असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मनुष्यबळ लवकरच वाढले. नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद द्यावा, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी म्हणाले.

पहिल्यांदाच ९ तास काम

या कार्यशाळेत काही तलाठी, मंडळाधिकाऱ्यांनी कार्यशाळेबाबत सांगताना, सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच ८ ते ९ तास काम केल्याचा समाधान व्यक्त केला. या ९ तासांमध्ये अनेकांना लॅपटॉपवर त्यांच्या सजामधील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे व त्रुट्या असेल तर त्याचा निपटारा जागच्या जागी करून घेत झिरो पेंडन्सी करून घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.