

The work on the MASIA Expo industrial exhibition is in its final stages.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षांपूर्वी ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२३ च्या यशस्वी आयोजनानंतर मसिआतर्फे यंदा मसिआ अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ हे ९ वे सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथे ८ ते ११ जा-नेवारीदरम्यान राज्यासह मराठवाड्यातील औद्योगिक विकासास चालना देण्यासाठी ऑरिक सिटी शेंद्रा येथे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
राज्यासह देशातील मोठे उद्योग आणि कांही आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय उद्योग आणि स्थानिक व मसिआचे सदस्य उद्योग यामध्ये सहभागी आहेत. उद्योग व उत्पादने ज्यात मशीन टूल्स, ऑटो कॉम्पोनन्ट्स, ऑटोमेशन, गेजेस, फिक्सचर्स, डाय अँड मोल्ड, मेटल सर्फेस फिनिशर इंडस्ट्रीज, अॅग्रिकल्चर, फूड इंडस्ट्रीज, फायनान्स इंडस्ट्रीज, सर्व शासकीय तसेच खासगी बँका, संस्था, एनर्जी अँड इलेकट्रिकल्स, इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी, स्टार्टअप्स, ट्रेडिंग, औद्योगिक क्षेत्रात सेवा-सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या, कन्स्ट्रक्शन इत्यादी यांच्यासाठी स्वतंत्र विभागामध्ये ८ हॉल व पगोंडा सह १५०० स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्यामुळे येणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व पसंतीनुसार ठराविक उत्पादनांच्या स्टॉलला भेट देणे सोईचे होईल. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृपया www. amexpo. in या संकेत स्थळावर भेट देऊन मोफत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे व आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष अर्जुन गायकवाड, संयोजक अनिल पाटील व चेतन राऊत तसेच समितीचे सर्व सदस्य यांनी केले आहे.