Sambhajinagar News : मनपाला ८२२ कोटींचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा

स्वहिस्सा भरण्यासाठी हुडकोकडून मिळणार अर्थसहाय्य, निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : मनपाला ८२२ कोटींचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळाFile Photo
Published on
Updated on

The way is clear for the Municipal Corporation to get a loan of Rs. 822 crores.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेला शहर पाणीपुरवठा योजनेतील स्वहिस्सा भरण्याच्या मार्ग मोकळा झाला असून, ८२२ कोटी रुपयांच्या स्वहिस्सा टाकण्यासाठी शासनाने हुडको हाऊसिंग अॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत कर्जाची हमी दिली आहे. यानिर्णयावर मंगळवारी (दि.९) 'पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून, पाणी योजनेच्या उर्वरित कामासाठी आहे. लागणाऱ्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar Crime : हिमाचलच्या व्यापाऱ्याला १३ लाखांचा गंडा

शहरातील दीर्घकालीन पाणीटंचाई दूर करण्यासाठी ७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला आता खऱ्या अर्थाने वेग मिळणार आहे. केंद्राच्या अमृत २ या योजनेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या योजनेत केंद्र सरकारचा २५ टक्के, राज्याचा ४५ टक्के तर महापालिकेचा ३० टक्के असा निधीचा ताळमेळ ठेवण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांचा वाटा जमा झाला असला तरी महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा स्वहिस्सा मोठा अडथळा ठरत होता.

Chhatrapati Sambhajinagar
Sillod News : नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित पंधरा तरुणांना एकोणपन्नास लाखांचा गंडा

महापालिकेची आर्थिक कोंडी पाहता हा भार शासनाने थेट उचलावा, अशी मागणी वारंवार होत होती. मात्र शासनाने तो निधी थेट न देता कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण केले. त्यावेळी महिनाभरात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

त्यानुसार मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय झाला. त्यापैकी ८२२ कोटी रुपये छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेसाठी, २६८ कोटी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी आणि ११६ कोटी मीरा-भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी देण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news