गंगापूर निवडणुकीचा कौल मतपेटीतून उमटलेला इशारा

स्थानिक स्वराज्यसंस्थांतील राजकारणाचा चेहरा पुन्हा एकदा अधोरेखित
 Gangapur election news
गंगापूर निवडणुकीचा कौल मतपेटीतून उमटलेला इशाराFile Photo
Published on
Updated on

The verdict of the Gangapur election is a warning that has emerged from the ballot box.

गंगापूर : गंगापूर नगरपरिषदेच्या निकालाकडे केवळ कुडकोण जिंकले, कोण हरलेपफया चौकटीत पाहणे म्हणजे या निवडणुकीतील खरा संदेश दुर्लक्षित करण्यासारखे ठरेल. या निकालाने स्थानिक स्वराज्यसंस्थांतील राजकारणाचा बदलता चेहरा एकदा अधोरेखित केला आहे.

 Gangapur election news
पैठणमध्ये खा. भुमरेंनी जादूची कांडी फिरवली

निवडणुकीत जंगी प्रचार, लक्षणीय मतदान आणि राजकीय समीकरणातील बदल यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत व्यापक प्रचार केला. जंगी प्रचार, मच आणि प्रतिष्ठेच्या लढाया असूनही मतदारांनी या वेळी वेगळाच कौल दिला.

स्थानिक निवडणुकांमध्ये मतदार रोजच्या जीवनाशी निगडित प्रश्नांवर अधिक संवेदनशील असतो. गंगापूरमध्ये पाणी, स्वच्छता, गटार व्यवस्था आणि नागरी सुविधांचा प्रश्न केवळ चर्चेचा विषय राहिला नाही, तर तो थेट मतदानाचा निकष ठरला. सत्ताधाऱ्यांचा कारभार कितीही राजकीय ताकदीने समर्पित असला, तरी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दुर्लक्षित केल्यास त्याची किंमत मतपेटीतून चुकवावी लागते, हे या निकालाने दाखवून दिले.

 Gangapur election news
Sillod News : शहरातील राजकारणाची दिशा ठरवणारा कौल

या निवडणुकीत प्रचाराची आक्रमकता प्रचंड होती. सभा, रॅली, बॅनरबाजी, सोशल मीडिया सगळे काही होते. मात्र मदिसणारा प्रचारफ आणि मजाणवणारा कारभारफ यातील फरक मतदारांनी अचूक ओळखला. प्रचार किती झाला, यापेक्षा शहरासाठी काय झाले, हा प्रश्न मतदारांनी विचारला आणि त्याचे उत्तर निकालातून दिले.

नियोजनाचे यश

राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय हा केवळ पक्षाचा विजय नसून, संघटनात्मक शिस्त आणि नियोजनाचे यश मानावे लागेल. वेळेत उमेदवार जाहीर करणे, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आणि घराघरांत पोहोचण्याची रणनीती याचा परिणाम दिसून आला. त्याउलट, युतीबाबतचा संभ्रम आणि शेवटपर्यंत स्पष्ट दिशा न मिळाल्याने विर- ोधकांचे गणित बिघडले.

विकासासाठी करावे लागणार

या सगळ्यातून एक महत्त्वाचा संदेश पुढे येतो. पैसा, सत्ता आणि प्रचार यांची मर्यादा असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्माकांत बन्सोड विश्वास, पारदर्शकता आणि कामाची जाणीव यांना पर्याय नाही. गंगापूरचा कौल हा याच वास्तवाचा इशारा आहे.

आता सत्तेत आलेल्यांसाठीही हा विजय अंतिम नाही, तर सुरुवात आहे. ज्या प्रश्नांवर मतदारांनी कौल दिला, त्याच प्रश्नांवर काम झाले नाही तर हा विश्वास टिकणार नाही. गंगापूरने आज संदेश दिला आहे; उद्या तोच संदेश पुन्हा मतपेटीतून उमटू शकतो, है विसरून चालणार नाही.

या निकालाने सत्तेतील आत्मविश्वास आणि आत्ममुग्धतेला धक्का दिला आहे. सत्ता हातात आहे म्हणजे जनता सोबत आहे, हा गैरसमज गंगापूरने चुरगळून टाकला. नगरपरिषद ही प्रयोगशाळा असते. इथे चुकांची किंमत थेट आणि तात्काळ मोजावी लागते. गंगापूरमध्ये ती किंमत मोजल्या गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय हा केवळ विरोधकांच्या अपयशाचा परिणाम म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. नियोजन, वेळेवर निर्णय आणि कार्यकत्यांची शिस्त यामुळे पक्षाने संधीचे सोने केले. मात्र हा विजय मसूटफ नसून मचाचणीफ आहे, हेही तितकेच खरे.

पैशाच्या चर्चांनी निवडणूक गाजली; पण निकालाने सांगितले की पैसा प्रचार करू शकतो, विश्वास निर्माण करू शकत नाही. गंगापूरच्या मतदारांनी दिलेला इशारा सत्ताधाऱ्यांनी गांभीयनि घ्यायला हवा. कारण हा कौल फक्त कालचा निकाल नाही; तो उद्याचा इशाराही आहे.

मतदानाचे सूक्ष्म राजकारण

या निवडणुकीत मतविभागणीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत होता. मात्र प्रत्यक्षात मअध्यक्षपदासाठी वेगळे, नगर-सेवकासाठी वेगळेफ असे मतदानाचे सूक्ष्म राजकारण झाले. मतदार आता केवळ पक्षनिष्ठेवर मतदान करत नाही तर परिस्थितीनुसार निर्णय घेतो, हेही या निकालातून स्पष्ट झाले.

वास्तवावर मतदान

गंगापूर नगरपरिषदेच्या निकालाने एक गोष्ट ठळकपणे स्पष्ट केली. मतदार आता फलकांवर नाही, तर फलकांआड दडलेल्या वास्तवावर मतदान करतो. सभा, रॅली, घोषणांचा गजर आणि पैशाची ताकद असूनही जनतेने प्रचाराला नाही तर अनुभवाला मत दिले.

निवडणुकीचे खरे प्रचारक स्थानिक स्वराज्यसंस्थांतील निवडणूक ही इङ्खमोठ्या राजकारणाची छोटी प्रतिकृती नसते; ती थेट नागरिकांच्या जगण्याशी जोडलेली असते. गंगापूरमध्ये नळाला पाणी येत नसताना, भाषणात विकासाच्या घोषणा ऐकण्याचा संयम नागरिकांनी दाखवला नाही. पाणी, स्वच्छता आणि नागरी सुविर्धातील अपयश हेच या निवडणुकीचे खरे प्रचारक ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news