ग्रामीण भागातील रस्ते होणार मजबूत

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेला मंजुरी
sambhajinagar news
ग्रामीण भागातील रस्ते होणार मजबूतfile photo
Published on
Updated on

The State Government has granted approval for the implementation of the Chief Minister Baliraja Farm/Panand Roads Scheme

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. महसूल विभागामार्फत ही योजना स्वतंत्रपणे अंमलात आणली जाणार असून, यामुळे तालुक्यातील गावातील शेत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार असल्याची माहिती तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली.

sambhajinagar news
नांदेड महापालिकेच्या नूतन महापौर कविता मुळे यांच्यासमोर समस्यांचा डोंगर...

मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत शेत व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलद गतीने केले जाणार आहे. रस्ते बांधकामासाठी खोदकाम, मुरूम टाकणे, पाणी टाकून रोलरने दाबणे तसेच डबरी करण करण्यात येणार आहे. एक किलोमीटरसाठी पंधरा लाख मंजूर करण्यात येणार आहे.

योजनेच्या अंमलबजा वणीसाठी विविध निधी स्रोतांचा वापर करण्यात येणार असून, व्यामध्ये १५ वा वित्त आयोग, खासदार/आमदार निधी, ग्रामपंचायत अनुदान तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी यांचा समावेश आहे. योजना कामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी काम सुरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर ड्रोनद्वारे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग (जिओटॅगसह) अनिवार्य करण्यात आले आहे.

sambhajinagar news
MLA Santosh Danve | शेतमाल वाहतुकीस येईल गती : आमदार दानवे

याचा खर्च कंत्राटदारानेच करायचा आहे. तसेच, कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्री, इंधन व मनुष्यबळासाठी दर निश्चित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर याबाबत दरपत्रक तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

योजनेच्या प्रगतीचा आढावा जिल्हास्तरीय समितीकडून दर तीन महिन्यांनी योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार असून, या योजनेमुळे शेतकऱ्यांना वाहतूक सुलभ होऊन शेतीमाल बाजारात नेणे सोपे होईल. तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाणंद रस्ता मजबूत करून करून घेण्यासाठी ही सुवर्णसंधी असून, नागरिक, शेतकरी यांनी लाभ घ्यावा. ज्या ठिकाणी अतिक्रमित रस्ते झालेले आहेत त्या ठिकाणी हेवेदावे दूर करून त्याचे अतिक्रमण सामंजस्याने दूर करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार संतोष गुट्टे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news