Sillod News : 'त्या' घातक रसायनाचे प्रदूषण विभागाने घेतले नमुने

पळशी शिवारात फेकलेले घातक रसायन प्रकरण; मातीचे नमुने घेतले
Sillod News
Sillod News : 'त्या' घातक रसायनाचे प्रदूषण विभागाने घेतले नमुनेfile photo
Published on
Updated on

The Pollution Department has collected samples of 'that' hazardous chemical

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : अज्ञातांनी फेकलेल्या घातक रसायनासह पाणी, मातीचे महाराष्ट्र प्रदूषण विभागाने शुक्रवारी (दि. ३) पाहणी करून तपासणीसाठी नमुने घेतले. बुधवारी रात्री अज्ञातांनी वाहनातून तालुक्यातील पळशी येथील पिरखोरा परिसरात घातक रसायनाचे ड्रम फेकून देत पेटवून पसार झाले होते. तर घातक रसायनाच्या धुरामुळे गुरुवारी दुपारी हा प्रकार समोर आला होता.

Sillod News
Sillod News : पळशी शिवारात अज्ञातांनी घातक रसायनाचे ड्रम फेकले

शुक्रवारी महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळाचे क्षेत्र अधिकारी दीपाली लोखंडे, ईनव्हायर मेंट पावर लिमिटेडचे (पुणे) प्रसाद प्रकाश चालीकवार, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार दादाराव पवार, वनविभागाचे सहायक वनरक्षक स्वप्नील भांबरे, वनपाल रेखा बरबडे, वनरक्षक साईनाथ पवार यांनी पाहणी केली. तर प्रदूषण विभागाने घातक रसायन, पाणी, मातीचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणीनंतर घातक रसायन संदर्भातचा उलगडा होणार आहे.

दरम्यान घातक रसायनाच्या घुरामुळे डोळ्यांची आग होत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर घातक रसायन पाझर तलावात वाहून जात होते. मात्र पोलिसांनी गुरुवारी रात्री पोलिस पाटील व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने जेसीपीच्या साह्याने आडवले. घातक रसायन तलावात गेले असते तर पाणी दूषित झाले असते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Sillod News
कीर्तनाला जाणाऱ्या रिक्षालचालकासह कुटुंबीयांना मारहाण

पंधरादिवसांपूर्वी खांदेशमधील तोंडापूर (जामनेर) परिसरात असेच घातक रसायनाचे ड्रम आणून फेकलेले आहे. घातक रसायनाची निर्जनस्थळी विल्हेवाट लावणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेची महसूल, प्रदूषण विभागाला आम्ही माहिती दिली. शुक्रवारी प्रदूषण विभागासह पोलिस प्रशासनानेही पाहणी केली. महसूल विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. यानंतर या घटनेचा पुढील तपास करण्यात येईल. एसआयआरच्या बैठकीमुळे महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहू शकले नाही. तसे पत्र महसूल विभागाला देण्यात आले आहे.
रवींद्र ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक, सिल्लोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news