

The plan to move the ESIC hospital from a government building to an expensive flat.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मुकुंदवाडी येथील : सेवा ईएसआयसी एमआयडीसीच्या हॉस्पिटल स्वस्तातील सरकारी इमारत सोडून चक्क खासगी सुमारे ७० हजार रुपये महिना किरायाच्या महागड्या टू बीचके फ्लॅटमध्ये हलविण्याचा घाट समोर आला आहे. हॉस्पिटल स्थलांतराची सूचना प्रशासनाने लावली आहे. मात्र, औद्योगिक वसाहतीतून कामगारांवर्ग - संघटनांकडून कडाडून विरोध होत आहे. हा डाव हाणून पाडण्याचा इशाराही दिला आहे.
हॉस्पिटलच्या स्थलांतराला कामगारांना तसेच त्यांच्या कुटूंबियांना वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुकुंदवाडी येथे एमआयडीसीच्या प्रशस्त इमारतीमध्ये मागील ४० वर्षांहून अधिक काळापासून ईएसआयसी दवाखाना क्रमांक ४ सुरू आहे. औद्योगिक वसाहतीत हॉस्पिटलची सुविधा असल्याने दररोज अनेक कामगार- त्यांचे कुटुंबीय उपचारासाठी येत असतात. दरम्यान, हॉस्पिटलच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. आनंद इंगळे यांनी कामगार किंचा डॉक्टरांची कोणतिही मागणी नसताना ही स्वस्त आणि सोयीची सरकारी इमारत सोडून हॉटेल ग्रॅण्ड ईकोटेलच्या बाजूच्या प्लॉट नं.पी. १६ या महागड्या सदनिकेत हॉस्पिटल हलविण्याचा खटाटोप सुरू केला आहे.
फ्लॅट पहिल्या मजल्यावर नवीन खाजगी फ्लॅट अपुऱ्या जागेत आणि रहिवासी वसाहतीत आहे, पार्किंगला जागाही नाही. फ्लॅटही पहिल्या मजल्यावर आजारपणात कामगारांना त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना उपचार घेण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या इमारतीतून ईएसआयसी हॉस्पिटल खासगी फ्लॅटमध्ये हलवून नये, बळजबरी केल्यास विरोध करू, असा इशारा देण्यात आला आहे.
स्थायी समिती सदस्य गैरहजर, तरी मंजुरी कशी?
ईएसआयसी स्थायी समितीच्या बैठकीत आठ पैकी ५ सदस्य तेही कामगार प्रतिनिधी गैरहजर असताना हॉस्पिटल हलविण्याचा प्रस्ताव मंजुरी कशी देण्यात आली? सूचक म्हणून वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. आनंद इंगळे यांनी असुविधेचे कारण देत रुग्णहितास्तव हॉस्पिटल हलवण्याचा प्रस्ताव ठेवला. ते दिशाभूल करत आहेत, या महिन्यांतच ते सेवानिवृत्त होत असल्याने यात त्यांना काय इंट्रेस्ट? असा प्रश्न कामगार प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.