Sambhajinagar News : महापालिका ५ प्रकारात करू शकते भूसंपादन

प्रशासकांकडून स्पष्टीकरण; टीडीआर, एफएसआय, आर्थिक मोबदल्याची माहिती
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar ... तर मिळणार नाही गुंठेवारीधारकांना मोबदला File Photo
Published on
Updated on

The municipality can acquire land in 5 ways

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडे सहा प्रकारच्या मोबदल्याची पद्धत आहे. यात टीडीआर, एमएसआय आणि आर्थिक मोबदल्याचीच माहिती नागरिकांना आहे. परंतु, याशिवाय इतरही चार प्रकार असून त्यानुसार महापालिका आता प्रक्रिया राबवेल, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar
संतापजनक : पुन्हा एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षाचालकाने टाकला हात, शहरातील शालेय विद्यार्थिनी असुरक्षित

महापालिकेने शहराच्या विविध भागांत पाडापाडीची प्रक्रिया राबविली आहे. यात बहुतांश बांधकामे ही बेकायदा आहेत. त्यामुळे यासर्वांना महापालिका आर्थिक मोबदला देणार नाही. उलट त्यांनीच शिल्लक जा-गेतील बांधकामाचे गुंठेवारी करताना बाधित जागा महापालिकेला मोफत हस्तांतरण करून द्यायचे आहे. नागरिक मोबदल्याची मागणी करीत आहेत. परंतु, महापालिका ज्यांची संपूर्ण जागा बाधित झाली. त्यांनाच आर्थिक मोबदला देण्याचा विचार करणार आहे. तसेच ज्यांच्या अधिकृत मालमत्ता आहेत. त्याबाबत भूसंपादन प्रक्रिया राबविताना महापालिका रीतसर प्रक्रिया करेल, असे सांगत महापालिका पाच प्रकारात भूसंपादन करू शकते, असेही प्रशासकांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhajinagar
Encroachment Campaign : हर्सूलच्या पाडापाडीला अखेर ब्रेक, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच होणार कारवाई

अशा आहेत भूसंपादनाचे प्रकार

१) शहर विकास आराखड्यात एखाद्याची काही जागा बाधित होत असेल. अन् उर्वरित जागेत त्याला परवानगी घेऊन बांधकाम करायचे असेल. महापालिकेकडे टीडीआरसाठी प्रस्ताव द्यायचा आणि परवानगीसाठी अर्ज करायचा.

२) एखाद्याची काही जागा रस्त्यात बाधित होत असेल. तर त्या जागेचा एफएसआय स्वरुपात मोबदला घेऊन उर्वरित जा-गया तो एफएसआय लोड करून अतिरिक्त बांधकाम करणे. ३) एखाद्या मालमत्ताधारकाने परवानगीविनाच बांधकामे केले. परंतु, आता मला पाडापाडीतून वाचायचे असेल तर समोर रस्त्यामध्ये जेवढी जागा बाधित होते. ती जागा महापालिकेला फीमध्ये हस्तांतरित करणे आणि उर्वरित जा-गेतील बांधकामाचे गुंठेवारी करणे. हे नियम गुंठेवारी कायदा ३२ क मध्ये आहे.

४) जेव्हा महापालिका भूसंपादन प्रक्रिया राबविते. तेव्हा बाधित जागेचा आर्थिक मोबदला देण्यात येतो.

५) रिझव्र्हेशन क्रेडिट सर्टफिकेट (आरसीसी) अत्यावश्यक पद्धतीमध्ये ही पद्धत वापरली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news