Stray Dogs News : मनपा लावणार शहरातील मोकाट कुत्र्यांना कॉलर बेल्ट

भटक्या प्राण्यांवर नियंत्रणाचा नवा प्रयोग : अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद
Stray Dogs News
Stray Dogs News : मनपा लावणार शहरातील मोकाट कुत्र्यांना कॉलर बेल्टFile Photo
Published on
Updated on

The Municipal Corporation to affix collar belts on stray dogs in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर उपाय म्हणून महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांना ओळख पटावी व त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी कॉलर बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी ५०

Stray Dogs News
Stray dog attack : पाच मोकाट कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; नारेगावात घराच्या ओट्यावरून ओढत नेले

लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात, गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांच्या मोठ्याप्रमाणावर वावर वाढला आहे. काही भागात कुत्र्यांच्या टोळ्या दुचाकीस्वारांच्या मागे धाव घेत असल्याने अपघातांच्या प्रमाणात काहीशी वाढ झाली आहे.

अनेकदा कुत्र्यांच्या भीतीने पळणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ले करण्याच्या घटनाही घडत आहेत. शाळकरी मुलांवरही कुत्र्यांचे हल्ले वाढत आहे. यावरून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र यावर महापालिकेकडून शहरातील भटक्या कुत्र्त्यांवर नियंत्रणाचा नवा प्रयोग राबवण्यात येणार आहे.

Stray Dogs News
रेणापुरात भटक्या कुत्र्यांची संख्या उदंड

या उपक्रमाअंतर्गत शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे लसीकरण, निर्वाजकरण केल्यानंतर त्यांना विशेष ओळख देण्यासाठी कॉलर बेल्ट लावले जाणार आहेत. यामुळे लसीकरण झालेले आणि न झालेले कुत्रे ओळखणे सोपे होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही बाढ होणार आहे. तसेच, प्राण्यांवरील क्रूरता टाळत त्यांचे व्यवस्थापन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या या उपक्रमांमुळे शहरातील भटक्या कुल्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र पेट पार्क

शहरात पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र पेट पार्क उभारण्याचाही महत्त्वाकांक्षी निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून नागरिकांना आपल्या पाळीव प्राण्यांसोबत सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात वेळ घालविण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या पार्कमध्ये खेळण्याची साधने, फिरण्यासाठी ट्रॅक, तसेच स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news