

The Municipal Corporation does not even have a list of dangerous buildings
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका मान्सूनपूर्व मोहिमेत शहरातील नाले सफाईसोबतच धोकादायक इमारतींना नोटीस बजावून मालमत्ताधारकांना स्वतःहून बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश देते. यंदा पाऊस सुरू होऊनही महापालिकेने धोकदायक इमारतींना नोटीस बजावलेली नाही. एवढेच काय तर प्रशासनाकडे धोकादायक इमारतींची यादीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
महापालिका प्रशासनाने दरवर्षी मान्सूनपूर्व कामांच्या तयारीत शहरातील नालेसफाईसह पथदिव्यांच्या वायरिंगची दुरुस्ती, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पडझड होण्याच्या स्थिती असलेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावते. तसेच पाऊस सुरू होण्याअगोदर त्या धोकादायक इमारती पाडण्याचे आदेश देते.
या इमारती मालमत्ताधारकांनी स्वतःहून न पाडल्यास त्याविरोधात मनपा अतिक्रमण विभागामार्फत पाडापाडाची कारवाई करते अन् पाडापाडीचा खर्च मालमत्ताधारकांकडून वसूल करते. गतवर्षी ऐन पावसाळ्यात महापालिकेने चार धोकादायक इमारतींवर कारवाई करुन त्या जमिनदोस्त केल्या होत्या. दरम्यान, शहरात अजूनही बहुतांश जुन्या व जीर्ण झालेल्या धोकादायक इमारती उभ्या आहेत. काहींमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत.
महापालिकेने २०१२ साली केलेल्या सर्वेक्षण आणि स्ट्रक्चरल ऑडिटमधून पुढे आलेल्या धोकादायक इमारतींचीच यादी प्रशासनाकडे सध्या उपलब्ध आहे. नव्याने स्ट्रक्चरल अॉडिटच करण्यात आले नाही. त्यामुळे जुन्याच यादीनुसार कारवाई होत आहे. यंदाच्या मान्सूनपूर्व मोहिमेत उपलब्ध यादीनुसार एकाही धोकादायक इमारतींना महापालिकेने नोटीस बाजावली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे महापालिकेकडे धोकादायक इमारतींची यादीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकत्याच झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत पुढे आला. आयुक्तांनी ही यादी आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले आहे.
यादी उपलब्ध नाही
शहरातील धोकादायक इमारतींबाबतची माहिती अद्यापही झोन कार्यालयांनी सादर केली नाही. त्यामुळे ही माहिती देता येत नाही, अशी धक्कादायक माहिती अतिक्रमण हटाव विभागाच्या उपायुक्त सविता सोनवणे यांनी मेसेजद्वारे