Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : कोणतीही फाईल ३ दिवसांत निकाली काढा

मनपा आयुक्तांचे निर्देश, महत्त्वाच्या संचिकांनाच दोन आठवड्यांचा अवधी
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Chhatrapati Sambhajinagar Municipal CorporationFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, : महापालिकेचे प्रशासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे केले जात आहे. या प्रणालीत प्रत्येक अधिकाऱ्याने ३ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी कोणतीही फाईल थांबवून न ठेवता निकाली काढावी. फारच महत्त्वाची, किचकट संचिका असेल तरच १५ दिवस थांबवून ठेवता येईल, असे आदेश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सोमवारी (दि.२२) विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेने ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात केली. ई-ऑफिसद्वारे ऑनलाईनद्वारे संचिका, पत्रे पाठवली जातात. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांसह विभागप्रमुखांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेल्या संचिका पत्रे तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवण्यात येऊ नये, तातडीने अभिप्राय व स्वाक्षरीसह वरिष्ठांकडे पाठविण्यात यावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच मनपा मुख्यालयासह इतर कार्यालयाची स्वच्छता करून ठेवण्यात आलेल्या वस्तू काढून घ्याव्यात. रस्ते व इतर कामासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचे मनपाच्या नावाने पीआर कार्ड तयार करावेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
JJ Hospital doctor death: ‘एमडी‌’च्या स्वप्नांचा अंत मृत्यूत, सरकारी मेडिकल कॉलेज की छळछावणी?

फायर एनओसीची नोटीस द्या

शहरातील मॉल, हॉस्पिटल, जिम, शाळा, व्यापारी प्रतिष्ठाने यांना फायर एनओसी घेण्यासाठी नोटीस बजवण्यात याव्यात. नोटीस बजावून त्यांना फायर एनओसी देण्यात याव्यात. एनओसी घेण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.धोकादायक इमारती किती ?

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप पाऊस आलेला नाही. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार करावी. इमारत धोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित इमारत मालकाला नोटीस बजावून इमारत काढून घेण्याची सूचना करावी.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
Pune Job Fraud: पुणे महापालिका नोकरी घोटाळा! बनावट नियुक्तिपत्रांद्वारे कोट्यवधींची फसवणूक उघड

नाल्याच्या काठावरील अतिक्रमणे काढा

नाल्याच्या काठावर असलेली अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. नाल्यामध्ये सोडलेल्या ड्रेनेज वाहिन्या ड्रेनेजलाईनला जोडाव्यात, मालमत्ताधारकांनी विरोध केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news