

The market was decorated with lights and a Christmas tree
पैठण, पुढारी वृत्तसेवा ख्रिस्ती बांधवांचा नातळ सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त नाताळ सणासाठी सांताक्लॉज, सजावटीसाठी बॉल्स, स्टार, समस ट्री, विद्युत रोषणाईच्या माळा या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. येशू जन्मकाळ साजरा करण्यासाठी प्रार्थना सोहळ्यासाठी घरातील वाईल्डर चर्च सज्ज झाली आहेत. समाजातील बांधव, महिला व लहान मुलांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला असून, बच्चे कंपनीमध्ये जिंगल बेल... जिंगल बेल, असे सूर उमटू लागल्याचे चित्र पैठण बाज ारपेठेत दिसून येत आहे.
२५ डिसेंबर रोजी नाताळचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २२) शहरासह तालुक्यातील विविध चर्चमध्ये स्पर्धा, सजावट, रोषणाई धार्मिक उपक्रमांना सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत नाताळसाठी लागणाऱ्या सजावट साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. केक शॉपी, सजावट साहित्याची दुकाने यांच्या प्रवेशद्वारावर सांताक्लॉजच्या वेशभूषेतील पुतळे स्वागतासाठी उभे करण्यात आल्यामुळे शहर नाताळमय झाले आहे.
लहान मुलांचे आकर्षण असलेले सांताक्लॉजचे मास्क, लाल रंगाच्या टोप्या, स्नो मॅन, ख्रिसमस क्रीव, पुतळे, खरेदीसाठी बाजारात गर्दी खेचत आहेत. फोल्डिंगचे ख्रिसमस ट्री विविध आकारांत उपलब्ध आहेत. एक फुटापासून ते सात फुटांपर्यंतच्या ख्रिसमस ट्रीला मागणी वाढली आहे.
मुलींमध्ये लाल रंगाच्या सांताक्लॉज फेस असलेल्या हेअरबेल्टची चलती आहे. सांताक्लॉजचा ड्रेसही लक्ष वेधून घेत आहे. नाताळसाठी ख्रिस्ती बांधव घराची खास सजावट करतात त्यासाठी चांदणीच्या आकारातील कंदील, झुंबर, वेल्स, झिरमिर, लाईटमाळा, लाईट स्टीकर, आकर्षित करणारे सांताक्लॉजचे मास्क बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत..
विविध उपक्रम, प्रार्थना सभा
चर्चमध्ये नाताळनिमित्त विविध उपक्रम व प्रार्थना सभांचे आयोजन केले आहे. नाताळसाठी चर्चची स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई करण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच येशू जन्मकाळाचा देखावा सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी गवत, मातीचे पुतळे यापासून येशू जन्माची कथा उलगडणार आहे.