Legislative Council elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा विजयी एल्गार

मेळाव्यात ४५७ नगरसेवकांची शिरसाठांच्या पाठीशी एकजूट : अपक्षांसह इतर गटातील सदस्यांच्या उपस्थितीचीही चर्चा
Legislative Council elections
Legislative Council elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा विजयी एल्गारfile photo
Published on
Updated on

The Mahayuti staged a massive show of strength on Sunday (the 14th) against the backdrop of the Legislative Council elections

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने रविवारी (दि. १४) जोरदार शक्तिप्रदर्शन करत विजयाचा एल्गार पुकारला. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित मेळाव्यात तब्बल ४५७ नगरसेवक सहभागी झाले. विशेष म्हणजे महायुतीचे घटक नसलेल्या काही अपक्ष आणि इतर गटांतील नगरसेवकांची उपस्थितीही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. यावेळी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Legislative Council elections
Local Body Constituency Election : लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघ : पुन्हा रंगणार प्रतिष्ठेची रणधुमाळी

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर पारंपरिकरीत्या शिवसेनेचा प्रभाव मानला जातो, मात्र मागील काही वर्षांत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेऊन पक्षाने या जागेवर दावा केला होता. महायुतीतील जागावाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला.

त्यानंतर पक्षाने सुहास शिरसाठ यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला काही प्रमाणात नाराजी आणि मतभेदांची चर्चा होती. मात्र रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. याप्रसंगी उपस्थित नगरसेवकांनी शिरसाठ यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

व्यासपीठावर ओबीसी विकासमंत्री अतुल सावे, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय शिरसाट, भाजप नेते रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार संतोष दानवे, महापौर समीर राजुरकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांकडून मतदान प्रक्रियेची रंगीत तालीमही करून घेण्यात आली.

या सरावात ४५७ नगरसेवकांनी सहभागी झाले होते. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा अधिक पाठिंबा मिळत असल्याचे संकेत मानले जात आहेत. यावरून निवडणुकीपूर्वीच महायुतीने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याची चर्चा सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Legislative Council elections
Parbhani Hingoli MLC Election : ठाकरे सेनेकडून डॉ. नावंदर रिंगणात उतरणार

... अन् नगरसेवक मतदानाची रंगीत तालीम

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील मतदान प्रक्रिया कोणत्याही त्रुटीशिवाय पार पडावी यासाठी नगरसेवकांकडून प्रत्यक्ष मतदानाचा सराव करून घेण्यात आला. या प्रक्रियेत ४५७ नगरसेवक सहभागी झाले. सरावातील ही संख्या महायुतीच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक मानली जात आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठीही एकजुटीचे संकेत

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्रितपणे लढण्याचे संकेत यावेळी देण्यात आले. महायुतीची ही एकजूट आगामी सहकार क्षेत्रातील राजकारणातही कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीच्या संयुक्त कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सदस्यांचा स्वतंत्र मेळावा घेण्यात आला. या बैठकीस सुमारे साडेचारशे सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे महायुतीबाहेरील काही सदस्यांचाही सहभाग यावेळी दिसून आला.
- अतुल सावे, ओबीसी विकासमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news