MP Kalyan Kale : मतांच्या चोरीमुळेच राज्यात महायुतीचे सरकार

कन्नड शहरात माजी आमदार नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे दिवाळी स्नेहमिलन उत्साहात पार पडले.
MP Kalyan Kale
MP Kalyan Kale : मतांच्या चोरीमुळेच राज्यात महायुतीचे सरकार File Photo
Published on
Updated on

The grand alliance government in the state is due to vote theft MP Kalyan Kale

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले होते, परंतु विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या उमेदवारांनी मतांची चोरी केली. केवळ मतांची चोरी झाल्यानेच महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले, असा गंभीर आरोप खासदार कल्याण काळे यांनी महायुती सरकारवर केला. त्यांच्या कारभारामुळे हे सरकार लोकांच्या नजरेतून उतरले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MP Kalyan Kale
Cotton News : शासकीय कापूस खरेदी केंद्राला मुहूर्तच मिळेना

कन्नड शहरात माजी आमदार नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे दिवाळी स्नेहमिलन एका मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. यावेळी जालनाचे खासदार कल्याण काळे, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी उपगराध्यक्षअ. वाहेद शेठ, माजी उपसभापती रुबीनाबी कुरेशी, महिला तालुका अध्यक्षा आव्हाळे, सचिन पवार माजी नगर-सेवक शेख ईप्तेखार ऊर्फ बाबा शेठ, धनराज बेडवाल, शहराध्यक्ष असद पठाण, प्रकाश बारगळ, बाबासाहेव मुरकुडे, विलास बोडखे, सुलतान पठाण, आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख याकूबभाई यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष गणेश शिंदे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news