मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Maratha Reservation
उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.13) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेवून शासनाची भुमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Maratha Reservation
औंढा तालुक्यात मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून युवकाने जीवन संपवले

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली. वेरूळ येथील शहाजी राजे स्मारकाबाबत बैठक घेण्याबाबत यावेळी शिष्टमंडळाने मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले. शिष्टमंडळात किशोर चव्हाण, रवींद्र बनसोड, बाळराजे आवारे पाटील, प्रविण नागरे, शशिकांत शिरसाट दिपक शेंबडे आदींचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news