औंढा तालुक्यात मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून युवकाने जीवन संपवले

मराठा आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवल्याची नातेवाईकांची माहिती
The youth ended his life due to the depression of not getting Maratha reservation in Aundha taluka
औंढा तालुक्यात मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून युवकाने जीवन संपवलेFile Photo
Published on
Updated on

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा

औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे पोटा येथील (२८ वर्षीय) युवक माणिक सखाराम पडघान राहणार पोटा (बु) याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून (शुक्रवार) 11:30 वाजण्याच्या सुमारास किसन देवराव लोणसणे यांच्या शेतात इलेक्ट्रिक वायरला हात लावून जीवन संपवले. सदर जीवन संपवल्‍याची घटना ही मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून केली आहे, अशी माहिती मृताचे नातेवाईक लक्ष्मण सखाराम पडघन यांनी औंढा पोलीस स्टेशनला दिली.

यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार संदीप टाक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत युवकाचा मृतदेह ताब्यात घेतलस. त्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आला. औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये या घटनेचा आकस्मित मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news