जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला घृष्णेश्वरांच्या विकास कामांचा आढावा

घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे स्वागत
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला घृष्णेश्वरांच्या विकास कामांचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला घृष्णेश्वरांच्या विकास कामांचा आढावाfile photo
Published on
Updated on

The District Collector reviewed the development works at Ghrishneshwar

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्री क्षेत्र वेरूळ येथील घृष्णेश्-वराचे मंदिर येथे भेट देत बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे शनिवारी दर्शन घेतले. जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच अधिकृत भेट असल्याने प्रशासन, देवस्थान ट्रस्ट तसेच स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला घृष्णेश्वरांच्या विकास कामांचा आढावा
क्लीन स्ट्रीट्स ॲप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी लिंक करा

यावेळी घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे घृष्णेश्वर मंदिर विश्वस्त समितीतर्फे राजेंद्र कौशिके, योगेश टोपरे व ब्रह्मवृंदांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी व शिवभक्तांनीही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत परिसरातील विविध प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मंदिर परिसरात वाढती भाविकांची गर्दी, अपुरी पार्किंग व्यवस्था, तसेच वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या यावेळी मांडण्यात आल्या. दर्शनानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मंदिर परिसरातच अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत घृष्णेश्वर विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला घृष्णेश्वरांच्या विकास कामांचा आढावा
'एनआरएमसी'च्या माध्यमातून होणार नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन

आराखड्यातील विविध कामांची सद्यस्थिती, निधी उपलब्धता, अडचणी व पुढील नियोजन याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सर्व विकासकामे निश्चित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. मंदिर परिसरातील पार्किंग व्यवस्था सुधारण्यावर विशेष भर द्यावा आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या.

अतिक्रमणावर होणार कारवाई

घृष्णेश्वर विकास आराखडा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगांचे नियोजन सुसूत्र करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनधिकृत दुकाने, बांधकामे व अडथळे यामुळे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news