

The dead rat in the CEO's cabin was finally found
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या दालनात दुर्गंधीचे कारण ठरलेला मेला उंदीर अखेर तब्बल १२ तासांच्या शोधानंतर बुधवारी छतावरील पीओपीमध्ये आढळून आला.
उंदीर हटविल्यानंतर दालनातील दुर्गंधी कमी झाली आणि कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मंगळवारी सीईओंच्या दालनात अचानक तीव्र दुर्गंधी पसरल्याने कामकाजात अडथळा निर्माण झाला होता.
दुर्गंधीमुळे सीईओ मिन्नू पी. एम. यांनी दालन रिकामे करून अजिंठा सभागृहातून प्रशासकीय कामकाज सुरू ठेवले. दरम्यान, बुधवारी सकाळपासून कर्मचारी दुर्गंधीच्या स्रोताचा शोध घेत होते. अखेर छतावरील पीओपीमध्ये मेलेला उंदीर असल्याचे आढळून आले. तो बाहेर काढल्यानंतर दालनातील दुर्गंधी हळूहळू कमी झाली आणि परिस्थिती पूर्ववत झाली.