Tree Plantation : फुलंब्रीत १.६५ कोटींचे वृक्षारोपण कागदावरच

४ हजार झाडे लावल्याचा दावा; प्रत्यक्षात एक हजारही नाहीत
Tree Plantation
Tree Plantation : फुलंब्रीत १.६५ कोटींचे वृक्षारोपण कागदावरचfile photo
Published on
Updated on

Phulambri's ₹1.65 crore tree plantation drive exists only on paper

अमित मोरे

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन आदेशानुसार दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात तब्बल १२ कोटींची झाडे लावण्यासाठी निविदा प्रक्रिया केली. त्यात एकट्या फुलंब्री तालुक्यात विविध चार ठिकाणी सुमारे ४२०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३९०० झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केला. परंतु प्रत्यक्षात स्थळपाहणी केल्यावर लावण्यात आलेल्या झाडांची संख्या एक हजारही अढळली नाही. एवढेच काय तर त्यापैकी केवळ १५ ते २० टक्केच झाडे जगली. विशेष म्हणजे यावर १ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

Tree Plantation
FDA : एफडीए'ला उच्च न्यायालयाचा दणका

शहरापासून केवळ २० ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलंब्री तालुक्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांचे वृक्षारोपण केले आहे. प्रत्यक्षात या कामासाठी २०२४ साली निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेशही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु असे असतानाही या कामाचा शुभारंभ तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच २०२५ मध्ये करण्यात आला.

गेल्या पावसाळ्यामध्ये तालुक्यात विविध ठिकाणी अधिकाऱ्यांनी चार कंत्राटदाराकडून वृक्षारोपण करून घेतले. यात शासन आदेशानुसार सुमारे ५ फूट उंचीची देशी झाडे लावणे आवश्यक होते, परंतु देशीसोबतच विदेशी झाडेही यात लावली. आऑक्सिजनचे प्रमाण जास्त असणाऱ्या झाडांकडे दुर्लक्षच करण्यात आले.

Tree Plantation
Gold loan fraud : बनावट सोने तारण ठेवून बँकेला १० लाखांचा गंडा

दरम्यान, अधिकाऱ्यांनी कंत्राटदार तेजस एजन्सीला तालुक्यात ४ हजार २०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु कंत्राटदाराकडून ३९०० झाडे लावण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केला आहे. याबाबत पुढारीच्या वतीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामाची तपासणी करण्यात आली. त्यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ती म्हणजेच ज्या ठिकाणी प्रशासनाने १ हजार झाडे लावण्यात आल्याचा दावा केला, त्या ठिकाणी मोजणीत केवळ २३३ झाडेच अडळून आली.

तर ज्या रस्त्यावर सुमारे २५४४ वृक्षारोपणाचा दावा केला, त्या ठिकाणी केवळ ३८६ झाडेच अडळून आली आहेत. एवढेच नव्हे तर अढळलेल्या झाडांपैकी प्रत्यक्षात जिवंत स्थितीत १० टक्केच झाडे रस्त्यांवर अढळली. तर शासकीय विश्रामगृह व सा. बां. कार्यालय परिसरात ४० ते ५० टक्के झाडे जिवंत स्थितीत होती.

सत्यस्थिती काय ?

एजन्सीने फुलंब्रीत ज्या चार ठिकाणी वृक्षारोपण केले, त्यातील तीन ठिकाणांना बुधवारी पुढारीच्या टीमने भेट दिली. त्यात वाणेगाव-शिवरी, साखर कारखाना ते निधोना रस्त्यासोबतच फुलंब्रीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्टहाऊस परिसरचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी हजारही झाडे अढळली नाहीत. रस्त्यांवर लोकवस्ती,

एका झाडाची किंमत ४१०० रुपये

सार्वजनिक बांधकाम विभागाने २०२४ साली जिल्ह्यात ३० हजार ६०० झाडे लावण्यासाठी १२ कोटी ४७ लाख रुपये खर्चाची निविदा राबविली. यात झाडे लावणे व त्याचे तीन वर्षे संगोपन करणे, असे कामाचे स्वरूप होते. वृक्षारोपणाची संख्या व खर्चाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news