Manja News : जीवघेण्या मांजाला ब्रेक ! पतंगबाज, विक्रेत्यांवर आता दयामाया नाही

ड्रोनद्वारे शोधमोहीम सुरू करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश
Manja News
Manja News : जीवघेण्या मांजाला ब्रेक ! पतंगबाज, विक्रेत्यांवर आता दयामाया नाहीFile Photo
Published on
Updated on

The dangerous and increasing use of nylon nets Police instructed to take strict action

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नायलॉन मांजाच्या धोकादायक व वाढत्या वापरामुळे होणारे अपघात आणि दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात येण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत, शहर पोलिसांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मांजा विक्रेते आणि जीवघेणी पतंगबाजी करणाऱ्या वापरकर्त्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत.

Manja News
Professor Murder Case : हत्येच्या रात्री नेमके काय घडले ?

मांजामुळे नागरिकांच्या सुर क्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पोलिसांनी आता हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. विशेषतः नायलॉन मांजाचा सर्रास वापर होणाऱ्या सिटीचौक आणि जिन्सी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आता विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या भागात अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी सुसज्ज असलेले ८ ड्रोन आकाशातून पाळत ठेवतील. पतंग उडवण्याच्या प्रमुख जागांवर ड्रोन कॅमेऱ्यातून धाग्याचे बारकाईने निरीक्षण केले जाईल.

संशयास्पद धागा आढळून येताच वापरणाऱ्या व्यक्तीजवळ पोलिसांचे पथक तात्काळ पोहोचेल आणि मांजा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने उचललेले हे पाऊल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जीवघेणी पतंगबाजी करणाऱ्यांना आता कायद्याच्या कठोर अंमलबजावणीने घातक परिणाम भोगावे लागणार आहेत.

Manja News
Sambhajinagar News : स्ट्राँग रूममधील हार्डडिस्क फुल्ल

अख्खे पोलिस दल रस्त्यावर

मांजाचे घातक परिणाम रोखण्यासाठी अख्खे पोलिस दल रस्त्यावर उतरले आहे. गुन्हे शाखेसह सर्व पोलिस ठाणे प्रभारींना गस्त घालण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. यासोबतच वरिष्ठ अधिकारीही स्वतः शाळा, महाविद्यालये यासह विविध ठिकाणी जनजागृतीसाठी भेटी देत आहेत. मांजा विकणाऱ्या दहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्यानंतर त्यांची येथेच्छ धुलाई करून रस्त्यावरून पोलिसांनी धिंड काढून आता गय केली जाणार नाही असा कडक संदेश दिला आहे.

आणण्याचे कृत्य मानवी जीव धोक्यात

नायलॉन मांजाची विक्री आणि वापर शासनाने पूर्णतः प्रतिबंधित केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर किरकोळ दंड नाही, तर गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नायलॉन मांजा विक्रेते आणि पतंग उडवणाऱ्यांवर बीएनएस कलम ११० (सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न) यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मांजामुळे झालेले अपघात हे दुर्लक्ष नसून, ते मानवी जीव धोक्यात आणण्याचे कृत्य मानले जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news