Dhondyavari : पैठणनगरी धोंड्यावारीनिमित्त भक्तिरसात न्हाऊन निघाली

श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचरणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Dhondyavari : पैठणनगरी धोंड्यावारीनिमित्त भक्तिरसात न्हाऊन निघाली
Published on
Updated on

The city of Paithan was immersed in a spirit of devotion on the occasion of Dhondyavari

पैठण, पुढारी वृत्तसेवा : कमला एकादशी अर्थात धोंड्यावारीनिमित्त पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी चरणी दर्शनासाठी गुरुवारी (दि.११) पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविक भक्तांनी नाथमंदिरात दर्शन घेतले. दिवसभर नाथ मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात भाविक भक्तांची गर्दी कायम होती. दिवसभरात ३ लाख भाविकभक्तांसह वारकऱ्यांनी दर्शन घेतल्याची माहिती नाथ संस्थांनचे विश्वस्त दादा पाटील बारे यांनी दिली. जणू काही नाथषष्टीचा सोहळा आज भरला होता एवढी मोठी गर्दी पहावयास मिळाली.

Dhondyavari : पैठणनगरी धोंड्यावारीनिमित्त भक्तिरसात न्हाऊन निघाली
Sambhajinagar News : धोंडे, दीपदान, पूजनासाठी महिला भाविकांची गर्दी

पवित्र धोंड्याचा महिना सुरू असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर महिलांनी एकादशीचे औचित्य साधत पवित्र गोदावरी नदीत स्नान केले. गोदामातेची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.

दिवसभर संत एकनाथ महाराजांच्या नामघोषाने संपूर्ण पैठण नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेली होती. धोंड्यावारीनिमित्त वारकरी, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

Dhondyavari : पैठणनगरी धोंड्यावारीनिमित्त भक्तिरसात न्हाऊन निघाली
Yedeshwari Devi Yatra : घुगरी प्रसादानंतर येडेश्वरी देवीच्या यात्रेची सांगता

नाथ संस्थानचे अध्यक्ष आमदार विलास भुमरे, विश्वस्त दादा पाटील बारे, विठ्ठलशास्त्री चनघटे प्राचार्य गनेश मोहिते, शहादेव लोहारे सह नाथ संस्थांनच्या वतीने आलेल्या वारकऱ्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साबुदाणा खिचडी भगर, केळी, लाडू वाटप करण्यात आले. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था तसेच दानशूरांनी देखील फराळाचे वाटप केले. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी मोठा बंदोबस्त मंदिर सह परिसरात तैनात केला होता.

दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल

दर्शनासाठी भाविकांच्या रांगा दिवसभर कायम होत्या. वारीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध प्रकारची दुकाने थाटली होती. पूजासाहित्य, धार्मिक पुस्तके, खेळणी, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंच्या दुकानांवर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. कपडा व्यावसायिकांची उलाढाल चांगली झाली. आजच्या वारीतून ४ ते ५ कोटी रुपयांची उलाढाल दिवसभरात झाली असल्याचे मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे पवन लोहिया म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news