Sambhajinagar News : धोंडे, दीपदान, पूजनासाठी महिला भाविकांची गर्दी

पैठण येथे कमला एकादशी धोंडेवारीनिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात
Sambhajinagar News
Sambhajinagar News : धोंडे, दीपदान, पूजनासाठी महिला भाविकांची गर्दीfile photo
Published on
Updated on

Crowd of women devotees for offering stones, lamps, and worship

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पुरुषोत्तम अधिकमासातील कमला एकादशी धोंडेवारीनिमित्त नित्य वारकऱ्यांसह हजारो महिला भाविक मोठ्या उत्साहात नाथचरणी नतमस्तक झाल्या. या पर्वकाळात दक्षिणकाशी गोदावरीचे पवित्र स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविक पैठणनगरीत दाखल झाले होते. पवित्र गोदावरी नदीत स्नान करून धोंडे, दीपदान, गोदावरी पूजन विधी पूर्ण करण्यासाठी एकच गर्दी केली होती.

Sambhajinagar News
Purushottampuri yatra : पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रश्न ऐरणीवर!

पुरुषोत्तम मास या अधिक महिन्यामध्ये कमला एकादशी धोंडेवारीचे औचित्य साधून मिळेल त्या वाहनाने विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर महिला भाविक, भक्त संतांच्या पदस्पशनि पावन झालेल्या पैठण येथे आले होते. या पवित्र पर्वकाळात भाविकांच्या स्नानासाठी पाटबंधारे विभागाने जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीत पाणी सोडले होते.

पहाटे नित्य काकड आरती श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या दोन्ही मंदिरात नाथवंशज यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न केली. यावेळी महिला भाविकांनी टाळ मृदंगाच्या तालावर फुगड्या खेळून भजन केले. मोठ्या प्रमाणावर महिला भाविक गोदावरी स्नान व दर्शनासाठी येणार असल्याने नाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार विलास बापू भुमरे, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांनी भाविकांचा उन्हापासून बचाव होण्यासाठी मंडप लावून सावली केली.

Sambhajinagar News
Yedeshwari Devi Yatra : घुगरी प्रसादानंतर येडेश्वरी देवीच्या यात्रेची सांगता

प्रत्येक भाविकांना स्वच्छ पाणी व प्रसाद वाटप करण्यात आला गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येणाऱ्या महिला भाविकांना तात्पुरत्या स्वरूपाचे चेंजिंग रूम उभारले होते. भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात याचे नियोजन नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांनी केले. मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह पाण्यामध्ये पो-हणारे स्वयंसेवकाचे पथक कार्यरत ठेवले होते. दोन्ही मंदिर परिसरात पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

बसस्थानकात प्रवाशांचे हाल

महिला भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सवलत योजनेमुळे मोठ्या संख्येने आल्या होत्या. नेहमीप्रमाणे येथील बसस्थानकात सावलीची व स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्था केलेली नव्हती. उन्हामुळे प्रवाशांचे यामुळे हाल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news