

The city became saffron-colored with the Kavad Yatra.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : श्रावण मासानिमित्ताने जाधववाडीतील रामेश्वर महादेव मंदिरातून काढण्यात आलेल्या कावड यात्रेत हजारो हिंदू संघटनांनी सहभाग घेतला. उत्तर प्रदेशहून आलेल्या आघोरी कलावंतांसह शहरातील शिवभक्तांमुळे मंगळवारी (दि. १९) संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
या कावड यात्रेचा शुभारंभ हभप महंत श्री रामगिरी महाराज यांच्या हस्ते जाधववाडीतील रामेश्वर महादेव मंदिरात करण्यात आला. श्रावण मासात सर्व शिवभक्त शिवाची आर-ाधना करतात. तोच धागा पकडून शिव शंभू प्रतिष्ठान व आमदार संजय केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व हिंदू संघटनांना एकत्र करून या कावड यात्रेचे आयोजन केले होते.
या यात्रेत जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर जिल्ह्यांतून शहरातूनही तब्बल १० हजार शिवभक्त सहभागी झाले होते. त्यात हिंदू विचारसरणीच्या संघटनांचे सुमारे ५ हजार युवकांनी सहभाग नोंदविला होता. ही कावड यात्रा जाधववाडीच्या रामेश्वर महादेव मंदिर येथून सुरू झाली.
त्यानंतर जिजाऊ चौक, टीव्हीसेंटर, उद्धवराव पाटील चौक, अण्णा भाऊ साठे चौक, शहागंज, सराफा, गुलमंडी, औरंगपुरामार्गे खडकेश्वर महादेव मंदिर येथे दाखल झाले. त्यानंतर दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्य जलाने खडकेश्वर मंदिरात महादेवाचा अभिषेक करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला.
७ किलोमीटर कावड यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत अघोरी कलावंतांचा संच, महादेवाची १२ फुट उंच मूर्ती, महादेवाची चार ४ फुटाची पिंड, हनुमानाची भव्य मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.