Sambhajinagar News : जिल्ह्यातील ५११ गावांत एक गाव एक गणपती

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला बैठकीत आढावा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्ह्यातील ५११ गावांत एक गाव एक गणपती File Photo
Published on
Updated on

One village, one Ganesha in 511 villages of the Sambhajinagar district

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : ग्रामीण भागात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी जनजागृती केली जात असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ५११ गावांत एकाच गणेश मंडळाची यंदा स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (दि.२०) घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : रुळांवर पाणी साचल्याने आज मुंबईकडे जाणाऱ्या दोन रेल्वे रद्द

राज्य सरकारने या वर्षीपासून गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, ग्रामीण पोलिस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

जिल्ह्यातील ५११ गावांत एकाच गणेश मंडळाची यंदा स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली. यात सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत ५४ गावांत, करमाड अंतर्गत ३८ गावांत, पिशोर पोलिस स्टेशन अंतर्गत ४४ गावांत, वडोद बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत ५२ ठिकाणी एक गणेश मंडळाची यंदा स्थापना होणार आहे. यासह अन्य पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावांतही एक गाव एक गणपती या संकल्पनेला मोठा प्रतिसाद ग्रामस्थांनी दिल्याचे सांगण्यात आले.

Sambhajinagar News
MPSC : एमपीएससी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

गणेश मूर्तीच्या आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेशा संख्येने बंदोबस्त ठेवण्यात यावा. विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक नियमन करण्याचे विसर्जनासाठी नद्या, तलाव तसेच कृत्रिम तलावांवर पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच उत्सावाचा काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार याची विशेष काळजी घेण्यात यावी.

आरोग्य विभागाने आपत्कालीन वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. उत्सवाचा काळात जिल्ह्यातील संपूर्ण सार्वजनिक गणेश मंडळाची संपर्क यादी अद्ययावत करुन पोलीस प्रशासनाने मंडळाच्या संपर्कात राहावे. तसेच अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात यावी. यात मिठाई, मोदक, नैवद्य, भेसळयुक्त पदार्थ तसेच दुकानावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

बैठकीतील प्रमुख सूचना

गणेशमूर्ती बसविल्या जाणाऱ्या भागात स्वच्छता मोहीम राबवा.

गणेशोत्सवातील देखावे भडक असू नयेत याची खबरदारी घ्या.

गणेशोत्सवाच्या परिसरात मांस, मच्छी विक्री होऊ नये हे बघा. विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवा.

उत्सवापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया करा.

वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news