Car-Rickshaw Collision
मोंढा पुलावर रिक्षाला उडवून दोघांचा बळी घेणाऱ्या कारचालकाला बेड्याPudhari

मोंढा पुलावर रिक्षाला उडवून दोघांचा बळी घेणाऱ्या कारचालकाला बेड्या

चिमुकलीसह तरुण ठार; एका न जन्मलेल्या जीवाचाही दुर्दैवी अंत
Published on

The car driver who ran over an auto-rickshaw on the Mondha bridge, killing two people, has been arrested.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सहकुटुंब जेवण करून घराकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने असा घाला घातला की, अवघ्या काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी (दि.२०) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका सुसाट कारने रिक्षाला दिलेल्या भीषण धडकेत २१ वर्षीय तरुणासह ५ वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. अलिझा या सात महिन्यांच्या गर्भवती मातेच्या पोटातील न जन्मलेल्या बाळाचाही या जगात येण्यापूर्वीच श्वास कोंडला गेला.

Car-Rickshaw Collision
Chhatrapati Sambhajinagar : उबाठाकडे आता १२ माजी नगरसेवकच शिल्लक

अख्तर रज्जा (२१), जोहरा (५), असे मृतांची नावे आहेत. याप्रकरणी कारचालक कश्यप विनोद पटेल (३३, रा. कुशलनगर) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला २३ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली असल्याचे जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक कुंभार यांनी सांगितले.

फिर्यादी अब्दुल अबित अब्दुला मुजीब (२१, रा. नवा मोंढा, हिंगोली, ह.मु. एमजीएमसमोर) याच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी (दि.२०) रात्री सव्वानऊ वाजता अब्दुल अबित, त्याची मावशी अजराबानू जेधपुरवाला, मुलगा अख्तर रज्जा, अहमद रज्जा, मुलगी उजमा बानू, त्यांची सून अलिझा, जेवा बानू, तिची मुलगी जोहरा, असे कुटुंबासह कामगार चौकातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून आनंदाने गप्पा मारत सर्व जण मोहंमद बारी यांच्या रिक्षाने (एमएच २०, ईक ४५५७) सिटी चौक भागातील घराकडे निघाले. मात्र मोंढा नाका उड्डाणपुलावर मागून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच-२०-जीक्यू-०२२१) रिक्षाला इतक्या जोरात धडक दिली की रिक्षाचा चक्काचूर झाला.

Car-Rickshaw Collision
Chatrapati Sambhajinagar Crime : आधी मैत्री, नंतर झालेला वाद, 'त्या' मुलीच्या बेतला जीवावर

पुलावरून खाली कोसळला तरुण

धडक इतकी भयानक होती की, रिक्षातील अख्तर रज्जा (२१) हा हवेत फेकल्या जाऊन थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अख्तरला आणि इतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अख्तर आणि जोहरा यांना तपासून मृत घोषित केले. गर्भवती मातेची अन् बाळाची ताटातूट

मयत चिमुकली जोहरा

सर्वात हृदयद्रावक बाजू म्हणजे, सात महिन्यांची गर्भवती असलेली अलिझा हिच्या पोटाला गंभीर मार लागला. या भीषण आघातामुळे तिच्या पोटातील सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. एका आईने पाहिलेले स्वप्न जन्म घेण्याआधीच या अपघाताने चिरडून टाकले.

कारचालकाचे लॉन्ग ड्राइव्ह व्हाया केंब्रिज

पोलिसांच्या माहितीनुसार, प्लायवूड व्यावसायिक कश्यप पटेल सातारा परिसरात पुतणीच्या गॅदरिंगसाठी कारने गेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर भावाच्या दोन मुली आणि त्या मुलींची एक मैत्रीण असे चौघेजण घराकडे निघाले. मात्र लॉन्ग डाइव्ह म्हणून त्यांनी थेट झाल्टा फाटा, केंब्रिज असा वळसा घालून आले. पुतणीची मैत्रीण क्रांती चौक हद्दीत राहत असल्याने तिला सोडण्यासाठी त्यांनी मोंढा नाका पूल चढला अन् घर-जिवळच हा अपघात झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news