Knife Attack : दारूसाठी पैसे न दिल्याने आरोपीने भाजीविक्रेत्याचा चाकूने गाल फाडला

२ हजार रुपये लुटले; जाब विचारणाऱ्या मुलावरही रॉड, दांडके, दगडांनी हल्ला; दोघांना अटक
Knife Attack
Knife Attack : दारूसाठी पैसे न दिल्याने आरोपीने भाजीविक्रेत्याचा चाकूने गाल फाडलाfile photo
Published on: 
Updated on: 

The accused slashed the vegetable vendor's cheek with a knife after not give money for liquor

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील आरोपीने एका भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. हातगाडीवरील गल्ल्यातून दोन हजार रुपये लुटून नेले. दरम्यान, वडिलांवर झालेल्या हल्ल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलावरही आरोपीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी लोखंडी रॉड, दांडके व दगडांनी हल्ला चढवून त्याचा डावा हात गंभीर जखमी केला. हा थरार रविवारी (दि. १५) सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील महूनगर गल्ली क्रमांक २ येथे घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात सख्ख्या भावांसह चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Knife Attack
Manoj Jarange : तर मराठा समाजाने आगामी निवडणुकीत धडा शिकवावा : जरांगे

स्वप्निल ऊर्फ सोपान तुपे (२२) त्याचा लहान भाऊ आशिष तुपे (२०), त्यांचा मित्र पियुष गढवे (२२) आणि अंश झिने (वय २०, सर्व रा. महुनगर), अशी आरोपींची नावे आहेत. यातील स्वप्निल आणि पियुष या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघेही रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

फिर्यादी भाऊसाहेब पांडुरंग बत्तीसे (५५, रा. महूनगर, गल्ली क्र. ४) हे परिसरात हातगाडीवर भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्री करत होते. त्याचवेळी आरोपी सोपान हा त्यांच्या हातगाडीजवळ आला आणि मला दारू पिण्यासाठी पैसे दे, अशी मागणी करू लागला. भाऊसाहेब यांनी पैसे देण्यास नकार देताच सोपानने खिशातून धारदार चाकू काढून थेट भाऊसाहेब यांच्या गालावर वार केला.

Knife Attack
Land Mafia : मनपाच्या २२७७ चौ.मी. जागेवर भूमाफियांचा डोळा

या हल्ल्यात गालावर खोल जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने ते जागेवरच कोसळले. सोपानने भाजीपाल्याच्या गाडीवरील गल्ल्यातून २ हजार रुपये काढून घेतले आणि मी तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. आरडाओरड ऐकून गल्लीतील नागरिक जमा होऊ लागताच आरोपीने तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच भाऊसाहेब यांची पत्नी, मुलगा सुनील आणि सून घटनास्थळी धावले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल . दरम्यान, भाऊसाहेब यांचा मुलगा सतीश हा सोपान तुपे याच्या घरी गेला. माझ्या वडिलांना चाकूने का मारले? अशी विचारणा त्याने केली असता, सोपानचा लहान भाऊ आशिष आणि त्याचे मित्र पियुष गढवे व अंश झिने यांनी सतीशला दांडा, दगड आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सतीशच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी घोरपडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.