Sambhajinagar News : ९०० ची जलवाहिनी सुरू होताच पडली बंद

मजीप्राचा गलथान कारभार : ज्वाइंटच्या नटबोल्टवरच ओतले सिमेंट शहरात १६ व्या दिवशीही निर्जळीच, नागरिकांचे पाण्यासाठी हाल
Sambhajinagar News
Sambhajinagar News : ९०० ची जलवाहिनी सुरू होताच पडली बंदFile Photo
Published on
Updated on

The 900-meter water pipeline was closed as soon as it was opened.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नऊशेची सुरू झालेली जलवाहिनी पुन्हा बंद पडली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारमुळे पाईपलाईनच्या जॉइंटवरच सिमेंट ओतण्यात आल्यामुळे या पाईपलाईनमधून पाणी मिळण्यास आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मजीप्राने घेतलेला शटडाऊन संपल्यानंतर १६ व्या दिवशीही शहराला निर्जळीचा सामना करावा लागला.

Sambhajinagar News
Sambhajinagar Crime: पत्नीला दारू पाजून पतीकडून अत्याचार; पीडितेवरही अल्पवयीन भाच्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा, अजब घटना

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचे काम सात ठिकाणी अद्याप बाकी आहे. त्यापैकी टाकळी फाटा येथे सर्वात मोठ्या जोडणीचे काम करण्यात आले. त्यामुळे या जलवाहिनीला खेटून गेलेल्या नऊशेच्या जलवाहिनीवर शटडाऊन घेण्यात आले. सुरुवातीला घेण्यात आलेले सहा दिवसांचे शटडाऊन पुढे वाढतच गेले.

पंधरा दिवस उलटले असले तरी नऊशेची पाईपलाईन सुरू झालेली नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता एम. एम. बाविस्कर हे शनिवारी दुपारी नऊशेची जलवाहिनी सुरू करण्यासाठी गेले. त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सिव्हिल आणि मॅकेनिकल विभागाच्या वादामुळे ही जलवाहिनी सुरू केली नाही. वरिष्ठांनी तंबी दिल्यानंतर रात्री साडेसात वाजता सुरू केलेली नऊशेची पाईपलाईन रात्री साडेआठ वाजता पुन्हा बंद करण्यात आली.

Sambhajinagar News
Temperature Drop : किमान तापमान घसरले, पारा १०.२ अंशांवर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सिव्हिल विभागाने २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर कॉंक्रिटीकरण केले. हे कॉंक्रिटीकरण करताना नऊशेच्या पाईपलाईनवर असलेला जेपी जॉइंट जो नटबोल्टने फिट केला जातो, हा जॉइंटच सिमेंटने बुजवून टाकला. नऊशेच्या जॉइंटवरच सिमेंट ओतल्यामुळे ही पाईपलाईनही बंद ठेवण्याची वेळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. सिमेंट पक्के होईपर्यंत ती सुरू केली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याचे कोलडमले नियोजन

नऊशेच्या पाईपलाईनवर शटडाऊन घेतल्यानंतरही दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या पाईपलाईनमधून मिळणारे २६ एमएलडी पाणी शहराला मिळत नसल्याने शहरात १६ दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यातच आणखी दोन दिवस नऊशेची जलवाहिनी बंद ठेवली जाणार असून, शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलडमले आहे. आठव्या ते दहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news