

Wife was forced to drink alcohol and tortured by her husband and his relatives
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलीच्या वाढदिवसासाठी घरी आलेल्या दोन भाच्यांसह पतीने पत्नीला दारू पाजून तिघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना देवळाई परिसरात ५ जुलै २०२४ ते १५ मे २०२५ या काळात वारंवार घडली. अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी नवी मुंबई येथे गुन्हा नोंद होऊन शनिवारी (दि.२९) चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अधिक माहितीनुसार, ३० वर्षीय विवाहिता देवळाई परिसरात राहते. तिचा पती तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नेहमी बळजबरीने दारू पाजायचा. तिच्या मुलीचा वाढदिवस असल्याने पतीचे दोन भाचे घरी आले होते.
त्या दिवशीही विवाहितेला पतीने दारू पाजून अगोदर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोन पैकी एक अल्पवयीन असलेल्या भाच्यानेही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एका भाच्याचा शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ बनवला.
तो पीडितेला दाखवून त्यानंतर वारंवार तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करून छळ करू लागले. या प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने नवी मुंबई येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अधिक तपास सहायक निरीक्षक समाधान पवार करत आहेत.
अल्पवयीन भाच्याशी संबंध ठेवल्यानेही गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता अल्पवयीन भाच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होती. हा प्रकार पतीच्या निदर्शनास आल्यानंतर बराच राडा झाला. त्यानंतर त्या विवाहितेवर पीडित अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून दोन महिन्यांपूर्वी पोस्कोचा गुन्हाही दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पिंक पथक करत आहे.