Thackeray Sena's protest : महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार; क्रांती चौकात आंदोलन

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत यावेळी कर्जमाफीचा शासकीय अध्यादेश जाळण्यात आला.
Thackeray Sena's protest
Thackeray Sena's protest : महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार; क्रांती चौकात आंदोलनfile photo
Published on
Updated on

Thackeray Sena's protest against inflation; agitation at Kranti Chowk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या फसव्या कर्जमाफी विरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने रविवारी (दि.७) क्रांती चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत यावेळी कर्जमाफीचा शासकीय अध्यादेश जाळण्यात आला.

Thackeray Sena's protest
Paithan Farmers Protest | मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफी निर्णयाची पैठणमध्ये प्रतिकात्मक होळी

पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन संपन्न झाले. सर्वप्रथम शिवसैनिकांनी सायकलवरून प्रतीकात्मक फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढत असलेल्या आर्थिक बोजाकडे सरकारचे लक्ष वेधले. तसेच रिकामे गॅस सिलिंडर आणून घरगुती गॅसच्या दरांविरोधात शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Thackeray Sena's protest
Chhatrapati Sambhajinagar | कांदा दराचा तिढा कायम; समृद्धी महामार्गावर शिवसेना उबाठाचे आंदोलन

अनेक शिवसैनिक टाळ घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी सुभाष पाटील, राजेंद्र काळे, सुनील शिंदे, अविनाश पाटील, संतोष खंडके, किशोर कच्छवाह, विठ्ठल बदर, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, शंकर ठोंबरे, संजय मोटे, मनोज पेरे, सोमीनाथ करपे, विष्णू जाधव, नगरसेवक सचिन खैरे, संदेश कवडे, बापू कवडे, मंगेश भाले, गोरख सोनवणे, दिनेश राजे भोसले, नितीन पवार, सुकन्या भोसले, मीना फसाटे, दुर्गा भाटी, सुनंदा खरात, छाया देवराज, वंदना कुलकर्णी, राजश्री पगार, रुपाली मुंदडा, सारिका शर्मा, मनीषा ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news